लोकमत न्यूज नेटवर्क पालघर : आदिवासी भागात कुपोषण, बालमृत्यू, होवू नयेत यासाठी आरोग्य विभागासह इतर सर्व प्रशासकीय विभागांनी दक्ष राहून पुढील चार महिने मिशन म्हणून काम करावे असे निर्देश आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी गुरवारी (११ मे) पालघर येथे दिले. पालघर जिल्हयातील कुपोषण व बालमृत्यूच्या गंभीर प्रश्ना संदर्भाबाबत उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत आरोग्यमंत्री बोलत होते. यावेळी आदिवासी विकासमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा, आमदार अमित घोडा, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा पोलीस अधिक्षक मंजूनाथ सिंगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.आरोग्य मंत्री पुढे म्हणाले की, पुढील चार महिने अत्यंत महत्वाचे आहेत. आदिवासी भागात तातडीने वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी १०८ ची विशेष रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून द्यावी. या रु ग्णवाहिके मधील डॉक्टरांनी घरोघरी जाऊन रु ग्णांच्या तपासण्या कराव्यात. वैद्यकीय अधिकारी व इतर वैद्यकीय सेवेतील पदे तत्काळ भरावी. कंत्राटी पध्दतीने कामगारांची यादीही तयार करावी. अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
कुपोषण रोखण्यासाठी मिशन
By admin | Updated: May 13, 2017 00:37 IST