शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे जव्हारमध्ये अपघात वाढले

By admin | Updated: December 2, 2015 00:11 IST

जव्हार सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या दुर्लक्ष तसेच बेजबाबदारपणामुळे वर्षभरात रस्ते अपघाताच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी उप

जव्हार : जव्हार सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या दुर्लक्ष तसेच बेजबाबदारपणामुळे वर्षभरात रस्ते अपघाताच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी उप अभियंता जाधव यांना पुन्हा लेखी निवेदन देवून हा रस्ता ८ तारखेपूर्वी दुरुस्त न केल्यास जव्हार फाट्यावर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे. येथील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून अनेक महिन्यात त्यांची डागडुजी झालेली नाही. तसेच खड्डे बुजवलेले नाहीत. यामुळे ते चुकविताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटून मोठे अपघात तसेच मोटारसायकल खड्यात आपटून गंभीर जखमी होणे, मोटारसायकल खड्यात आपटल्याने मागे बसलेली व्यक्ती मागच्यामागे पडणे अशा घटना वारंवार घडत असतात. परंतु पोलीस स्टेशन मध्ये या मृत्यू व अपघातांची नोंद हि रस्ते अपघात अशी होत असल्याने बांधकाम विभाग आपली जबाबदारी झटकून मोकळा होतो. एवढे अपघात होऊनही अद्याप एकाही लोकप्रतिनिधीने सा.बां. विभागाला जाब विचारलेला नाही.साधारण दोन महिन्यांपूर्वी जव्हार ते चोथ्याची वाडी आणि केळीचा पाडा या रस्त्यावर गाडी खड्यात आपटल्यामुळे मोटारसायकलवर मागे बसलेल्या एका आदिवासी महिलेचा पडून मृत्यू झाला. त्या नंतर काही दिवसांत ७ महिन्यांची गर्भवतीचा याच रस्त्यावरून प्रवास करताना वेळेपूर्वीच प्रसूती झाली अन् त्या बालकाचा मृत्यू झाला. या दोन्ही दुर्दैवी घटनां नंतर तेथे बांधकाम विभागाच्या विरोधात संतापाची लाट उसळली. यानंतर जुनी जव्हार ग्रामपंचायत चे सदस्य नरेंद्र मुकणे यांनी विभागाला ५ नोव्हे.रोजी लेखी पत्र देवून हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा. या पुढे जर खड्यांमुळे अपघात अथवा जीवितहानी झाल्यास सर्व ग्रामस्थ पक्षभेद विसरून तीव्र आंदोलन छेडू आणि त्यास सर्वस्वी उप कार्यालय जबाबदार राहील असा निर्वाणीचा इशारा दिला होता. परंतु या पत्रालाही केराची टोपली दाखवण्यात आली. विशेष म्हणजे, या पत्रा नंतर १५ दिवसातच याच रस्त्यावर रेखा वसंत सापटा (४५) या महिलेचा अपघाती मृत्यू झाला. (वार्ताहर)