शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना कापडी पिशव्यांच्या प्रशिक्षणातून रोजगारासह प्लॅस्टिकला देणार पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2018 17:18 IST

मीरा भाईंदर पालिकेच्या महिला बालकल्याण समितीचा निर्णय

मीरारोड - प्लॅस्टिक बंदीमुळे नागरिक व व्यापाऱ्यांना कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्यासह गरजू महिलांना कापडी पिशव्या शिवण्यासाठी मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय मीरा भाईंदर महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीने घेतला आहे. लवकरच प्रशिक्षण सुरू करून त्यातून रोजगार मिळवून देण्याचे प्रयत्न समिती करत असल्याचे सभापती शानू गोहिल यांनी सांगितले . प्लॅस्टिक बंदीमुळे पर्यायी कापडी पिशव्यांची कमतरता भासत आहे. प्लॅस्टिक मुक्त शहर करण्याचा निर्धार सर्वांनी केला आहे. महिला बाल कल्याण समितीमध्ये आम्हीदेखील प्लॅस्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन व्हावे यासाठी शहरातील गरजू महिला, बचत गट मधील महिलांना कापडी पिशव्या बनवण्याचे मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय सर्व महिला नगरसेविकांनी मिळून घेतला आहे . त्यासाठी  आमदार नरेंद्र मेहता व महापौर डिंपल मेहता यांचे मार्गदर्शन मिळाल्याचे गोहिल म्हणाल्या.

कापडी पिशव्यांना असलेली मागणी पाहता गरजू महिला - मुलींना त्याचे प्रशिक्षण दिल्यास त्या घरच्या घरीच कापडी पिशव्यांची निर्मिती करू शकतील. यातून त्यांना रोजगार मिळेल . या प्रशिक्षणाचा कालावधी १ महिन्याचा असेल. त्यासाठी आर्थिक तरतूद केली असून प्रशिक्षक नेमण्याची कार्यवाही सुरू आहे. भाजपाच्या नगरसेविका दीपिका अरोरा यांनी प्रशिक्षण देण्याचा ठराव मांडला तर काँग्रेसच्या रुबिना शेख यांनी त्यास अनुमोदन दिले . 

पिशव्या बनवण्यासाठी आवश्यक सहकार्य करणार आहोत. तसेच बनवलेल्या पिशव्यांना बाजारपेठ मिळावी म्हणून शहरातील विविध व्यावसायिक, उद्योजक आदींशी संपर्क साधून त्यांना या गरजू महिलांनी बनवलेल्या कापडी पिशव्या घेण्यासाठी विनंती करणार आहोत असे शानू यांनी सांगितले . 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी