शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर भाजपा कार्यकर्त्यांचा जिल्हाध्यक्षांनी आयोजित केला मेळावा; मेहता व समर्थकांच्या भूमिकेकडे लक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2021 15:43 IST

मीरा भाईंदर भाजपाच्या जिल्हाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांनी ऍड. रवी व्यास यांची नियुक्ती केल्या पासून मेहता व समर्थक यांनी उघडपणे विरोध करत दंड थोपटले आहेत .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर भाजपाचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवी व्यास यांनी नुकतीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन केलेल्या चर्चे नंतर पाटील यांनी १८ नोव्हेंबर रोजी भाईंदरच्या माहेश्वरी भवन येथे भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे . यामुळे व्यास यांच्या जिल्हाध्यक्ष निवडीवरून विरोधात असलेले माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या भूमिकेकडे त्यांचे समर्थक आणि विरोधक यांचे लक्ष लागले आहे . 

मीरा भाईंदर भाजपाच्या जिल्हाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांनी ऍड. रवी व्यास यांची नियुक्ती केल्या पासून मेहता व समर्थक यांनी उघडपणे विरोध करत दंड थोपटले आहेत . भाजपात मेहता समर्थक आणि मेहता विरोधक असे दोन तट पडलेले आहेत . व्यास यांच्या नियुक्ती विरोधात प्रदेश कार्यालयावर नगरसेवक , कार्यकर्ते यांनी धडक देत इशारे दिले होते . याद्वारे मेहतांनी शहरातील त्यांच्या शक्तीचे प्रदर्शन भाजपा नेत्यांना करून दिल्याचे मानले जाते . 

परंतु प्रदेश नेतृत्वाने मेहता व समर्थकांच्या दबावतंत्राला झुगारून भाजपा जिल्हाध्यक्ष म्हणून ऍड. व्यास यांच्यावरच शिक्कामोर्तब केले . तर मेहतांना प्रदेश सचिव पद दिले . परंतु मेहतांनी पक्षाने दिलेले प्रदेश सचिव पद जाहीरपणे नाकारून जिल्हाध्यक्ष पद नियुक्ती विरोधात मागे हटणार नाही अशी भूमिका दाखवून दिली . मेहता व समर्थक हे ऍड. व्यास यांना जिल्हध्यक्ष मनायला तयार नसून त्यांचा उल्लेख टाळला जात आहे . 

या आधी तत्कालीन जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी भाईंदर पश्चिम येथे सुरु केलेल्या भाजपा जिल्हा कार्यालयाचे उदघाटन फडणवीस यांनी केले होते . पण त्या कार्यालयास देखील विरोध करत मेहतांनी त्यांच्या सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शनच्या सेव्हन स्क्वेअर शाळे बाहेरील भाजपा कार्यालय जिल्हा कार्यालय म्हणून सुरु ठेवले आहे .  आज शहरात भाजपाची दोन वेगळी जिल्हा कार्यालये आहेत . 

भाजपा नेतृत्वाने व्यास यांच्या जिल्हाध्यक्षपदाची नियुक्ती कायम ठेवत मेहतांच्या दबावाला भीक न घालण्याचा पवित्रा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे . नुकतीच उत्तनच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मध्ये जिल्हाध्यक्ष ऍड . व्यास यांनी काही भाजपा नगरसेवक , कार्यकर्ते , माजी जिल्हाध्यक्ष आदींसह फडणवीस व पाटील यांची भेट घेतली . शहरातील घडामोडी, भाजपाची संघटना , पुढील वर्षी होणारी पालिका निवडणूक आदींवर बातचीत झाली . 

त्या नंतर प्रदेशाध्यक्षांनी ऍड. व्यास यांना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी १८ नोव्हेम्बरची वेळ देत स्वतः मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचे सांगितल्याने त्याची जय्यत तयारी सुरु झाली आहे . जिल्हाध्यक्षांनी आयोजित केलेल्या ह्या पक्षाच्या मेळाव्या कडे मेहता व त्यांच्या समर्थकां कडून कसे प्रत्युत्तर दिले जाईल या कडे अनेकांचे लक्ष लागले आहे . 

टॅग्स :BJPभाजपा