शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदरमध्ये घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी, वीजेचाही खेळखंडोबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 18:20 IST

मीरा रोड परिसरातही मंगळवार दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मीरा भार्इंदरमधल्या सखल भागात पाणी साचले. येथील स्थानिकांच्या घरांमध्येही पावसाचं पाणी शिरले.

मीरा रोड, दि.20 - मीरा रोड परिसरातही मंगळवार दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मीरा भार्इंदरमधल्या सखल भागात पाणी साचले. येथील स्थानिकांच्या घरांमध्येही पावसाचं पाणी शिरले. तर 10 ठिकाणी मोठी झाडं पडल्याच्या घटना घडल्या. तर दोन ठिकाणी शॉर्ट सर्किट झाले तर अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता.मंगळवारपासून वादळीवा-यासह सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शहराला झोडपून काढले. सोसाट्याच्या वा-यामुळे रात्री जेसल पार्क मधील आशीर्वाद रुग्णालयाजवळील रस्त्यावर मोठे झाड एका कारवर कोसळले. कारचे नुकसान झाले असून सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही. या शिवाय भार्इंदर पोलीस ठाण्यामागील कस्तुरी रुग्णालयाजवळ, शांती गार्डन परिसरातही झाडं पडली. सर्वात जास्त झाडं उत्तन भागात पडली. डोंगरी खदानीजवळ मोठं झाड मध्यरात्री रस्त्यातच पडल्याने वाहतूक बंद झाली. या शिवाय लाईट हाऊस, केशवसृष्टी, धावगी, भुतबंगला, करईपाडा भागात झाडं पडली. वृक्ष प्राधिकरण व अग्निशमन दलाने पडलेली झाडं हटवली आहेत.मंगळवारी सायंकाळपासून तर पावसाने जोर धरल्याने शहरात जागोजागी पाणी साचले. लोकांच्या घरांमध्ये तसेच दुकान आदींमध्ये पाणी शिरले. मीरारोडच्या सिल्वर सरितामध्ये जास्त पाणी शिरल्याने अग्निशमन दलाचे जवान तैनात होते. रात्री व आज सकाळीदेखील घर - दुकानांमध्ये साचलेले पाणी उपसण्यासह नागरिकांची साफसफाई चालली होती.हाटकेश भागात इमारतीच्या मीटर बॉक्समध्ये रात्री पाणी शिरले असताना रिलायन्स एनर्जीला वीज पुरवठा खंडित करण्यासाठी सातत्याने नागरिकांसह पालिका कर्मचा-यांनी फोन करुनदेखील कुणी आले नाही. तर डेल्टा गार्डन व भार्इंदरच्या रावल नगरमध्ये शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. पाणी साचल्याने काही भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. तर अधेमधे वीज पुरवठादेखील खंडीत होत होता.सर्वत्र साचलेले  पाण्याचा निचरा होण्यास पालिकेने बांधलेल्या नाल्यांची पातळी योग्य नसल्याने अनेक ठिकाणी पंप लाऊनसुद्धा पाणी कमी होत नव्हते. रात्र भर ज्या भागात पाणी साचले तेथील नागरिकांचे अतोनात हाल झाले.