शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

म्हात्रे खून : पोलिसांवर 30 वर्षांनंतर कारवाई होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 23:08 IST

मागासवर्गीय आयोगाने मागविला अहवाल; बोगस साक्षीदारांवरही अ‍ॅक्शन

नालासोपारा : १९८८ साली घडलेल्या यादव म्हात्रे यांच्या निर्घृण खून खटल्यात धनदांडग्या मारेकऱ्यांना वाचविण्यासाठी गरीब आदिवासींना नाहक गोवणाऱ्या पोलिसांवर अखेर कारवाईची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कारण या प्रकरणी राष्ट्रीय आदिवासी आयोगाने महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना व पालघर पोलीस अधीक्षकांना तसेच जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने अहवाल पाठविण्याचा आदेश दिला आहे.१९८८ साली कामण येथील सामाजिक कार्यकर्ते यादव म्हात्रे यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता.या खुनातील धनदांडग्या आरोपींना वाचविण्यासाठी गरीब आदिवासींना नाहक गोव्यात आले होते. त्यांनी कबुली द्यावी यासाठी त्यांचा अमानुष छळ करण्यात आला होता. दरम्यान त्यापैकी एका आदिवासीचा मृत्यू झाला होता.तर एक आदिवासी अजूनही मरणोन्मुख आहे.या लढ्यात आदिवासी सेवक व यादव यांचे सख्खे भाऊ गंगाधर म्हात्रे यांनी लढा दिल्यामुळे अटकेत असलेल्या आदिवासी आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती.गेली ३० वर्षे हा लढा ते एकटे लढत आहेत. त्यांनी या खटल्यातील सीआयडी अधिका-यांची लबाडी कोर्टाच्या निदर्शनास आणली होती. या दुष्कृत्याचा जाब पोलिसांना आता मागासवर्गीय आयोगापुढे द्यावा लागणार आहे. त्यामुळे पोलिसांचे व या खटल्यात खोटी साक्ष देणाºयांचे धाबे दणाणले आहेत.त्यानुसार आता चौकशी व कारवाईची चक्रे वेगाने फिरणार आहेत.काय आहे यादव खून प्रकरण...कामण येथील यादव म्हात्रे यांचा २९ जून १९८७ साली गोळ्या झाडून खून करण्यात आला होता.हे प्रकरण त्यावेळी खूप गाजले होते.हा खून होतांना पाहणारे प्रत्यक्षदर्र्शी व त्यांचे लहान बंधू गंगाधर म्हात्रे गेली तीस वर्षे आपल्या भावाच्या मारेकºयांना शिक्षा व्हावी म्हणून न्यायालयात ३० वर्षे झुंज देत आहेत.यात त्यांना हळूहळू न्याय मिळू लागल्यामुळे आरोपींचे धाबे दणाणले होते. त्यांच्यावर गेल्या वर्षी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यात त्यांच्या पायाला जबर दुखापत झाली.अनेक शस्त्रक्रि या व लाखो रूपये खर्च केल्यानंतरही वर्षभर ते बिछान्यावर पडून होते.त्यानंतरही बरे झाल्यावर आपल्या भावाच्या मारेकºयांना शिक्षा मिळावी हा एकच ध्यास घेतलेल्या म्हात्रे यांनी बचेंगे तो और भी लढेंगे म्हणत आपला लढा सुरू ठेवला. आरोपींकडून आपल्यावर पुन्हा हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेवून त्यांनी पोलिस संरक्षणाची मागणी केली होती. परिस्थीतीचे गांर्भीय लक्षात घेऊन राज्य माहिती आयुक्त थँक्सी थेकेकरा यांनी म्हात्रे यांना पोलिस संरक्षण देण्याचे आदेश दिले.पोलीस अधीक्षक शारदा राऊत यांनी दोन महिने टाळाटाळ केल्यानंतर पोलिस संरक्षण दिले होते. नवे पोलीस अधीक्षक सिंगे यांनी पूर्वसूचना न देता त्यांचे संरक्षण काढून घेतले. त्यांनी सिंगे यांची भेट घेऊन या प्रकरणी खुलासा मागीतला असता जिल्हा पोलीस संरक्षण कमिटीच्या निर्णयानुसार ते काढून घेतल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. या खटल्यात आदिवासींना गोवून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलिस अधिकाºयांवर व खोटी साक्ष देणाºयांवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.खºया आरोपींना सोडून तीन आदिवासींना पोलिसांनी या प्रकरणात गोवले होते. दिलीप, अशोक व गणपत तुंबडा यांनी गुन्हा कबूल करण्यासाठी पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. त्यामुळे अशोक तुंबडांचा १४ दिवसात तर त्याचे वडील गणपत तुंबडा यांचा वर्षभरात मृत्यू झाला. दिलीप तुंबडा हे हाडामांसाचा गोळा बनून जिवंत आहे. २२ वर्षानंतर तुंबडांची मुक्तता झाली. त्यानंतर मूळ आरोपींवर खटला भरला. त्यामुळे मुख्य आरोपींना अभय देण्यासाठी पोलिसांनी तुंबडाकुटुंबीयांचा बळी घेतल्याचे उघड झाले.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हाVasai Virarवसई विरार