शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमधील १०९ पोलिसांना विरार-बोळिंज येथे म्हाडाची घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 01:31 IST

गृहनिर्माण मंत्र्यांच्या हस्ते वाटप : घराचे स्वप्न होणार पूर्ण

नालासोपारा : विरार पश्चिमेकडील यशवंतनगरजवळील म्हाडा कॉलनी-मधील २४ मजल्यांच्या इमारतीमध्ये म्हाडाने तब्बल १८६ पोलिसांना राखीव घरे ठेवली होती. पण या कार्यक्रमाला गेल्या दोन वर्षांपासून मुहूर्त मिळत नसल्याने पोलिसांना घरे मिळाली नव्हती. अखेर पालघर पोलीस दलातील १०९ कर्मचाऱ्यांना म्हाडाच्या कोंकण मंडळातर्फे विरार बोळिंज येथे उभारलेल्या गृहनिर्माण योजनेतील इमारत क्रमांक १० मधील सदनिकांचे वाटप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते बुधवारी दुपारी करण्यात आले.गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांच्या ए-३ या शासकीय निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमाला कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. नितीन महाजन, आयुक्तालयाचे प्रतिनिधी सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव, म्हाडाचे वित्त नियंत्रक विकास देसाई, मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी सविता बोडके व अन्य अधिकारी उपस्थित होते.यावेळी गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांच्या हस्ते सदनिका निश्चित झालेल्या पालघर पोलीस दलातील पोलीस कर्मचारी प्रवीण आव्हाड, जागृती मेहेर, रुक्मिणी राठोड, अदिती सरनोबत, फिरोझ तडवी यांना सदनिकेचे प्रथम सूचनापत्रही प्रदान करण्यात आले. कोंकण मंडळातर्फे उर्वरित सदनिका लाभार्थीना लवकरच प्रथम सूचनापत्र पाठविली जाणार आहेत.म्हाडाच्या कोंकण मंडळातर्फे विरार बोळींज येथे सुमारे ११९ एकर जमिनीवर गृहनिर्माण योजना विकसित करण्यात आली आहे. या योजनेतील टप्पा-३ मधील इमारत क्रमांक १० मधील १८६ सदनिका पालघर पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांना वितरित करण्यास महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या ४ जानेवारी २०१९ रोजीच्या ठराव क्रमांक ६८०९ अन्वये मान्यता देण्यात आली आहे. १८६ सदनिकांसाठी पालघर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागविण्याकरिता मार्च २०१९ मध्ये जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार पालघर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्याकडून १०९ अर्जदारांच्या नावांची यादी पाठविण्यात आली होती. दरम्यान, म्हाडाकडून घरे भेटली, पण त्याची प्रक्रिया किचकट असून २० ते २५ कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. ही कागदपत्रे असतील तरच पात्र की अपात्र ठरवूनच घरे देण्यात येणार असल्याचे एका पोलीस कर्मचाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. 

टॅग्स :mhadaम्हाडाJitendra Awhadजितेंद्र आव्हाड