- सुरेश काटे । लोकमत न्यूज नेटवर्कतलासरी : कुपोषणावर मात करण्यासाठी त्याच्याशी संबंधित सर्व विभागांचे एकत्रिकरण करण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली तसेच आॅगस्टमध्ये आपण मोखाडयात अशीच आढावा बैठक घेणार आहोत असेही स्पष्ट करून जनभावनेवर फुंकर घातली. त्यांनी आज उधवा प्राथमिक आरोग्य केंद्रातील माता व बाल आरोग्य संवर्धन दिन कार्यक्र माचे उदघाटन केले. दुपारी १ वाजता तलासरीतील ठक्कर बाप्पा विद्यालयाच्या मैदानावर हेलीकॉप्टरने आगमन झाले. त्याच्या समवेत पालकमंत्री विष्णू सवरा , खासदार चिंतामण वनगा , आमदार पास्कल धनारे तसेच शासकीय अधिकारी होते .मुख्यमंत्र्यांनी जांभळून पाडा येथील सुमन राजेश लाखात व गोविंद भिवा लाखात यांना शासकीय योजनेतून मिळालेल्या घरकुलांची पाहणी केली, कासपाडा येथे मागेल त्याला शेततळे या योजनेतून कृषी विभागा मार्फत तयार करण्यात आलेल्या लहानू रत्ना शिंगडा यांच्या शेततळ्याची तसेच शासकीय आश्रमशाळेची पाहणी करून लार्सन अँड टुब्रो च्या वतीने तयार करण्यात आलेल्या डिजिटल लॅब ची पाहणी करून तिचे कौतुक केले. उधवा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विविध विभागाची पाहणी केली या वेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून हृदय शस्त्रक्रि या करण्यात आलेल्या विपुल शिवाजी वरठा , रेजिना सुनील उंबरसडा , सुवर्णा लहान्या आडगा , निशा जयराम रिडया , नैतिक सुभाष नम, नेहा महेश कडू या बालकांची भेट घेतली तेव्हा त्यांनी मुख्यमंत्र्यांना गुलाब पुष्प दिले. त्यांचे मुख्यमंत्र्यांनी मनापासून कौतुक केले.विभागांचे एकत्रिकरणगरोदर माता व स्तनदा माता यांना दिल्या जाणाऱ्या पोषक आहाराची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. सॅम व मॅम बालकांचे व मातांचे कुपोषण कमी करण्याचा प्रयन्त केला जाणार असून त्यासाठी सर्व संबंधित विभागांचे एकत्रीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी ही बैठक आणि दौरा जव्हार मोखाडा येथे करायला हवा होता अशी जी जन भावना होती तिचा आदर करण्यासाठी त्यांनी आॅगस्टमध्ये मी मोखाडा येथे अशीच आढावा बैठक घेणार आहे असे स्पष्ट केले.
आॅगस्टमध्ये मोखाड्यात बैठक
By admin | Updated: May 19, 2017 04:10 IST