शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता बंदमुळे मीरा-भाईंदरकर वेठीस; वाहतूककोंडीत भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 22:56 IST

महिनाभरापासून जलवाहिनीचे काम सुरू

भाईंदर : शहराच्या मुख्य मार्गावर मेट्रोच्या कामामुळे मोठी वाहतूककोंडी होत असतानाच हाटकेश येथील महत्त्वाचा पर्यायी मार्गही महिनाभरापासून जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी बंद आहे. यामुळे पर्यायी मार्गावरही कोंडी होत असून कामामुळे रहिवासी संतापले आहेत. पाणीपुरवठा विभाग व कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे नागरिक वेठीस धरले गेले आहेत. या कामासाठी अजून एक महिना जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मेट्रो-९ साठी छत्रपती शिवाजी महाराज या मुख्य रस्त्यावर खोदकाम सुरू झाले आहे. आधीच या रस्त्यावर कोंडी होत असताना मेट्रोच्या कामामुळे कोंडीत अधिकच भर पडली आहे. त्यामुळे भाईंदरमधील नागरिकांनी काही प्रमाणात अंतर्गत रस्त्यांचा वापर सुरू केला आहे. यात न्यू गोल्डन नेस्टपासून थेट हाटकेश चौक व पुढे महामार्गावर वेस्टर्न हॉटेलजवळ निघणाऱ्या मार्गाचा वापर वाढला आहे. शिवाय, घोडबंदर-अदानी पॉवर स्टेशनकडून हाटकेशला येणाºया रस्त्याचा वापरही आधीपासूनच केला जात आहे. परंतु, हाटकेशच्या या मुख्यमार्गावरील रस्त्याची एक बाजू जलवाहिनी टाकण्याच्या कामामुळे गेल्या महिनाभरापासून बंद आहे. या भागात जलवाहिनी वरून असल्याने ती भूमिगत टाकण्याचे काम पाणीपुरवठा विभागाकडून सुरू आहे. हा रस्ता एका बाजूने बंद केल्याने परिसरातीलरहिवाशांना आपली वाहने काढणे तसेच ये-जा करणे जिकिरीचे बनले आहे. खोदकामामुळे धुळीचे साम्राज्य पसरले असून घरांमध्ये धुळीचा थर साचत आहे. यामुळे काही जणांना श्वसनाचा त्रास होऊ लागला आहे.

मोठी जलवाहिनी जमिनीखालून टाकणे आवश्यक असल्याने हे काम पालिकेने हाती घेतले आहे. जमिनीच्या खाली अंतर्गत जलवाहिनी टाकली जात आहे. आणखी महिनाभर या कामासाठी लागणार असला, तरी भविष्यातील पाणीपुरवठा बाधित होऊ नये म्हणून काम आवश्यक आहे. कामादरम्यान माहितीसाठी फलक लावणे व नागरिकांचा त्रास कसा कमी होईल, यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. - चंद्रकांत वैती, उपमहापौर

महिनाभरापासून काम सुरू आहे. हा रस्ता बंद केल्याने नागरिकांना त्रास होतो. वाहतुकीच्या नियमनासाठी तसेच कामाच्या माहितीचेसूचनाफलक लावले नसल्याने पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कंत्राटदारावर कारवाई करावी. नागरिकांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना कराव्यात. - गोवर्धन देशमुख, रहिवासी

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर