शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेजच्या मैदानात एमडी ड्रग्ज विक्री; दोन आरोपींना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2023 15:41 IST

विरार पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, ओल्ड विवा कॉलेजजवळच्या मैदानात दोन आरोपी एमडी ड्रग्ज (मेथॅडॉन) नावाचा अमलीपदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहेत.

नालासोपारा : एका कॉलेजच्या मैदानात एमडी ड्रग्ज विकणाऱ्या दोन आरोपींना विरार पोलिसांनी अटक केली आहे.  पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करत मुद्देमाल हस्तगत केला आहे.

विरार पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, ओल्ड विवा कॉलेजजवळच्या मैदानात दोन आरोपी एमडी ड्रग्ज (मेथॅडॉन) नावाचा अमलीपदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहेत. पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांना याबाबत अवगत करून पोलिस निरीक्षक (गुन्हे) दिलीप राख व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी विरार येथील ओल्ड विवा कॉलेजजवळच्या मैदानात सापळा रचला.

या ठिकाणावरून ओमकार रामचंद्र तुळसकर आणि मोनिश वसीम बेग या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांंच्याकडून १० हजार ८०० रुपये किमतीचे अंदाजे ९.५५० ग्रॅम वजनाचे पांढऱ्या व लालसर रंगाचे लहान-लहान दाणे (साखरे सारखे दिसणारे) एमडी ड्रग्ज अमलीपदार्थ जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलिस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलिस आयुक्त रामचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विरारचे  वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) दिलीप राख, गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिस उपनिरीक्षक संदेश राणे, हवालदार सचिन लोखंडे, संदीप जाधव, इंद्रनील पाटील, विशाल लोहार, संदीप शेरमाळे, योगेश नागरे, मोहसिन दिवाण, बालाजी गायकवाड, रोशन पूरकर, दत्तात्रय जाधव यांनी केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार