शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा भूमिपूजन प्रकरणी भाजपाचे माजी आमदार - नगरसेवकांवर दाखल गुन्हा रद्द करण्याची महापौरांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2022 18:56 IST

तर महापौर पदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवल्याने कारवाईची शिवसेनेची मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - महापौरांच्या प्रभागात झालेल्या बेकायदा भूमिपूजन प्रकरणी महापौरांच्या तक्रारी वरून भाजपच्या माजी आमदार व नगरसेवक आदींवर महापालिकेने गुन्हा दाखल केल्या नंतर आता महापौरांनी घुमजाव करत आपली काही तक्रार नाही . आपल्या मंजुरीने कार्यक्रम झाल्याचे सांगत महापालिकेला खोटे ठरवत गुन्हा रद्द करण्याची लेखी मागणी केली आहे . तर आरोपीना वाचवण्यासाठी बेकायदा भूमिपूजनाचे समर्थन करून महापौर पदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली असल्याने महापौरांवर कारवाईची मागणी शिवसेनेने केली आहे . 

महापालिकेने काशीमीरा पोलीस ठाण्यात १७ मार्च रोजी मीरा गावठाण येथील तलावाच्या कामाचे बेकायदा भूमिपूजन व बेकायदा बॅनर लावल्या प्रकरणी भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता , नगरसेवक सचिन म्हात्रे व सुजाता पारधी आदींसह एकूण ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे . फिर्यादीत महापौर ज्योत्सना हसनाळे यांनी पालिका आयुक्तां कडे तक्रार केल्या नंतर चौकशी करून त्यात तथ्य आढळल्याचे नमूद आहे . 

महापौरांच्या प्रभागात महापौरांनाच डावलून झालेल्या ह्या बेकायदा भूमिपूजन वरून महापौरांनीच तक्रार केल्याने भाजपाच्याच लोकांवर दाखल गुन्ह्याने चांगलीच चर्चा रंगली . पण महापौरांनी आता पोलीस आयुक्त व काशीमीराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  याना लेखी पत्र देऊन दाखल गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे . 

पालिकेचा कार्यक्रम ठरवणे , पाहुणे बोलावणे हा महापौर नात्याने माझा अधिकार असून त्या अधिकाराचा वापर करून १३ मार्च रोजी आपण तलाव सुशोभीकरण व रस्ता उदघाटनचा कार्यक्रम आयोजित केला होता . मेहतांना मी निमंत्रित केले होते पण मला उपस्थित राहता आले नाही असा खुलासा महापौरांनी पत्रात केला आहे . 

शिवसेनेने महापौरांवर कारवाईची मागणी केली आहे . कार्यक्रम घेण्याचे अधिकार महापौरांनी सांगितल्या नुसार असतील . पण प्रशासना कडून कार्यक्रमासाठी रीतसर निमंत्रण, आयोजन होते . शासन आदेश व महासभा ठराव नुसार स्थानिक आमदार , खासदार , विरोधी पक्ष नेता आदीना सुद्धा निमंत्रित करावे लागते . परंतु ज्या कामाचा कार्यादेश अजून निघाला नाही व प्रशासनाने अधिकृत आयोजन केले नसताना महापौरांनी बेकायदा कार्यक्रमास त्यांची मंजुरी व समर्थन असल्याचे सांगणे म्हणजे गुन्ह्यात त्यांचा सहभाग स्पष्ट होतो . शिवाय महापौरांनी आरोपीना वाचवण्यासाठी पदाचा गैरवापर केला असून त्यांनी पदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली असल्याची टीका शिवसेनेचे पदाधिकारी रामभवन शर्मा यांनी केली आहे .

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर