शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच पक्षांत जुळतील नवी समीकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 23:53 IST

या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीचा जो निकाल लागला आहे.

पालघर : या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीचा जो निकाल लागला आहे. त्यामुळे सर्वच पक्षातील सत्ता समीकरणे बदलली जाणार आहेत. राजेंद्र गावितांचा विजय झाला असला तरी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा, जिल्हाध्यक्ष पास्कल धनारे आणि राज्यकार्यकारणी सदस्य बाबाजी काठोळे यांना ज्यापद्धतीने मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण प्रचारयंत्रणेपासून दूर ठेवले आणि आपल्या विश्वासातील आमदार प्रविण दरेकर यांच्या हाती सगळी प्रचारसूत्रे दिली. ते सूचक होते आता या दृष्टीकोनातून भाजपमध्ये बरेच संघटनात्मक बदल अपेक्षित आहेत. विक्रमगडचे नेते आणि विकास आघाडीचे सूत्रधार निलेश सांबरे यांच्यारुपाने भाजपाच्या हाती मोठा नेता लागला आहे. त्यामुळे त्यांना संघटनेत महत्वाचे पद मिळू शकते. तसेच ते भाजपचे एखाद्या मतदारसंघातील उमेदवारही ठरू शकतील. पालघर जिल्ह्याला नवा जिल्हाध्यक्षही लाभू शकतो.तसेच आगामी निवडणूकीच्या प्रचाराची सूत्रे प्रविण दरेकर यांच्याकडेच पुन्हा सोपविली जाऊ शकतात. पालघर जिल्ह्याची फारशी माहिती नसताना व तिथे शिवसेनेचा आमदार असताना त्यांनी भाजप उमेदवाराला ३ हजारांहून अधिक मतांची आघाडी प्राप्त करून दिली आहे. ते पाहता ते आता या मतदारसंघात भाजपला विजयाप्रती आश्वस्त करणारे नेते ठरले आहेत. त्यामुळे त्यांचेच जिल्ह्यात आणि भाजपाच्या राज्यसंघटनेत महत्व वाढलेले आहे. तर या पार्श्वभूमीवर भाजपाच्या राज्य कार्यकारणीचे सदस्य बाबाजी काठोळे यांचीही गच्छंती होण्याची चिन्हे आहेत. तसेच विष्णू सवरा यांच्याही स्थानाला धक्का लागू शकतो.शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा जरी पराभूत झालेले असले तरी पहिल्याच निवडणूकीत निवडणूक मोहिमेचे सूत्रधार आणि पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रविंद्र फाटक तसेच दोन नवनियुक्त जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण आणि राजेश शहा यांचे संघटनेतील महत्व निश्चितच वाढणार आहे.काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दत्ता नर हे भाजपात प्रवेशकर्ते झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकारिणीची रचना नव्याने होण्याची शक्यता आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष केदार काळे यांचा कोणताही प्रभाव या निवडणूकीत न पडल्याने त्यांनाही नारळ मिळू शकतो. तर अनेकदा खासदारकी जिंकलेल्या शिंगडा यांना पडलेली ४७७१४ मते पाहता यापुढे त्यांचा उमेदवारीसाठी विचार होईल की नाही असा प्रश्न निर्माण होईल. काहीही झाले तरी मला किंवा माझ्या पुत्राला लोकसभेची उमेदवारी दिली पाहिजे या त्यांच्या अट्टाहासाला काँग्रेस यापुढे बळी पडणार नाही, असेही चित्र आहे. याचा अर्थ या मतदारसंघात काँग्रेसला नवा उमेदवार शोधावा लागेल किंवा राष्टÑवादीसोबत आघाडी झाली तर हा मतदार संघ राष्टÑवादीला अर्पण करावा लागेल.