शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

वाणसामानासाठी विरारमधील बाजारांत पुन्हा गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 12:08 AM

पालिकेच्या नव्या नियमावलीला फाटा : निर्धारित केलेली सकाळी ७ ते ११ वेळ पडतेय अपुरी?

लोकमत न्यूज नेटवर्क विरार : कोविड-१९चे वाढते संक्रमण लक्षात घेऊन अत्यावश्यक सेवेतील दुकानांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी वसई-विरार महापालिकेने नव्या नियमावलीनुसार सकाळी ७ ते ११ ही वेळ निर्धारित केली आहे, मात्र त्यानंतरही विरारमधील रस्त्यांवर 'बाजारगर्दी' होताना दिसत आहे.मागील काही दिवसांत वसई-विरारमधील कोविड-१९ संक्रमण प्रचंड वाढले आहे. त्या तुलनेत आरोग्य सुविधांचा असलेला अभाव, नागरिकांची बेफिकिरी या सगळ्यामुळे पालिकेने नव्या नियमानुसार अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास सांगितले आहे.या नियमावलीमुळे वसई-विरारमधील रस्त्यावर सकाळी व संध्याकाळी दिसणारी गर्दी कमी होईल, अशी अपेक्षा पालिकेला होती. शिवाय त्यामुळे कोविड-१९ च्या वाढत्या संक्रमणालाही आळा बसेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती, मात्र दैनंदिन खरेदीच्या नावाखाली नागरिकांची 'बाजारगर्दी' कायम आहे. मागील वर्षी घेतलेल्या कडक लॉकडाऊनमुळे अनेक लोकांवर उपासमारीचे संकट आले होते; कित्येक लोकांच्या नोकरी गेल्या होत्या. याचे परिणाम म्हणून विरारमधील सामान्य नागरी वस्तीतील नागरिकांनी हाताला मिळेल ते काम स्वीकारले होते. कित्येकांचा कल भाजीविक्रीकडेच होता. अन्य व्यवसाय करणाऱ्यांनीही  नागरिकांची दैनंदिन गरज ओळखून भाजी व तत्सम विक्री व्यवसाय निवडला होता. याचे परिणाम म्हणून मागील वर्षांत वसई-विरारच्या रस्त्यावर फेरी व्यवसाय करणाऱ्यांत प्रचंड वाढ झाली तसेच कोविड-१९चे संक्रमणही वाढल्याचे दिसून आले.दरम्यान, पालिकेच्या अत्यावश्यक सेवेच्या दुकानांत भाजी व तत्सम व्यवसायांबाबत कोणतेही लायसन्स किंवा हा व्यवसाय कुणी करावा, याबाबत स्पष्टता नसल्याने अशा दुकानांच्या संख्येत वाढ झाली असून  मागील लॉकडाऊननंतर ही संख्या  आणखी वाढली आहे. दुसरीकडे नागरिकही आठवडा खरेदीपेक्षा दैनंदिन खरेदीवर भर देत असल्याने वसई-विरार शहरांवरील कोविड संकट कायम आहे.माॅलसमोरही मोठी रांगराज्यभरातील वाढती कोरोना रुग्ण संख्या व नागरिकांची बेफिकिरी पाहता राज्य सरकार पुन्हा एकदा 'कड़क लॉकडाउन' घेईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे बुधवारी वसई-विरारकर पुन्हा एकदा वाणसामानासाठी घराबाहेर पडलेले दिसले. याचे परिणाम म्हणून शहरातील डिमार्टसमोरही खरेदीकरता भली मोठी रांग लागलेली होती.