शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

सागरी पर्यटनस्थळे ड्रग्जमाफियांच्या रडारवर?, सुरक्षा यंत्रणा सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 23:49 IST

Palghar : पालघर जिल्ह्याला ११० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

-   हितेन नाईक/अनिरुद्ध पाटील 

पालघर/बोर्डी : मुंबईत ड्रग्जमाफियांवर पोलीस आणि अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाकडून छापेसत्र सुरू असल्याने, ते लगतच्या उपनगराकडे वळले आहेत. तेथेही त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यामुळे नाताळ आणि ३१ डिसेंबर या काळात पालघर जिल्ह्यातील सागरी पर्यटनस्थळांना हे माफिया लक्ष करण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, येथील सुरक्षा यंत्रणेला सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.पालघर जिल्ह्याला ११० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. येथे वसई, कळंब, अर्नाळा, राजोडी, कोरे, उसरणी, केळवे, चिंचणी, पारनाका, चिखले, घोलवड, बोर्डी आणि झाई ही सागरी पर्यटनस्थळे प्रसिद्ध आहेत. यापैकी बहुतेक चौपाट्या वस्तीपासून लांब आणि गर्द सुरू बागांनी वेढलेल्या असल्याने निर्मनुष्य अशा या भागात नीरव शांतता असते. त्यामुळे बाहेरून आलेले पर्यटक आणि स्थानिक यांचा संबंध कमी येतो.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात आठ महिने हॉटेल व्यवसायाने मंदीचा सामना केला आहे. नाताळ आणि ३१ डिसेंबर या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी दाखल होणाऱ्या पर्यटकांना विशेष कार्यक्रम आणि सवलतीचे पॅकेज देऊन पर्यटकांना आकर्षित करून, या व्यवसायाला उभारी देण्याचा प्रयत्न या व्यावसायिकांकडून केला जात आहे. सिनेअभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्युनंतर मुंबईत ड्रग्जमाफियांवर मोठ्या प्रमाणात पोलीस आणि अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाकडून कारवाई सुरू झाल्याने, त्यांनी उपनगरांकडे मोर्चा वळविला आहे. मात्र, तेथेही कारवाई सुरू झाली आहे. नाताळ ते नवीन वर्ष या काळात शहरी पर्यटक विविध भागांतून पालघर जिल्ह्यातील पर्यटनस्थळाला पसंती देतात. कोरोनाचा धोका लक्षात घेता, राज्य शासनाने ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे.

पाेलिसांचीही असणार नजरयंदा ग्रामीण भागातील सागरी पर्यटनस्थळांना ड्रग्ज पेडलर्स लक्ष करण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा संभाव्य धोका लक्षात घेता, जिल्ह्यातील पोलीस आणि अमली पदार्थ विरोधी विभागाला सक्रिय राहण्याची गरज आहे. या काळात होणारे विविध कार्यक्रम आणि पर्यटनस्थळांवर वावरणारे पर्यटक यांच्यावर करडी नजर ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार