शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
2
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
3
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
4
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
5
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
6
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
7
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
8
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
9
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
10
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
11
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
12
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
13
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
15
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
16
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
17
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
18
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
19
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
20
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा

सागरी सुरक्षेचे वाजले बारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:47 IST

पोलीस स्थानकांवर कोट्यवधीचा खर्च : ड्युटी मात्र मोर्चे, आंदोलने अन् मंत्र्यांच्या सुुरक्षेची

- हितेन नाईक 

पालघर : २६/११ च्या हल्ल्यानंतर जिल्ह्यातील किनारपट्टीच्या सुरक्षिततेसाठी आज पर्यंत कोट्यवधी रु पयांचा खर्च करून सागरी पोलीस ठाणी निर्माण करण्यात आली आहेत. त्यातील बहुतांशी पोलिसांना सागरी सुरक्षिततेकडे लक्ष पुरवू देण्याऐवजी मोर्चे, आंदोलने, मंत्र्यांचा बंदोबस्त आदी दुय्यम कामांना जुंपले जात आहे. त्यामुळे सागरी सुरक्षेचे बारा वाजले आहेत. याचाच फायदा घेऊन काही संशयित जिल्ह्यात शिरकाव करू शकत असल्याचा गुप्तचरांनी दिलेला इशारा नवनियुक्त पोलीस अधिक्षकांसाठी आव्हान ठरू शकतो.

पाकिस्तानातील लष्कर-ए-तोईबा (एलईटी), जैश-ए-मोहम्मद (जेइएम) आदी संघटनांचे दहशतवादी समुद्रीमार्गे येऊन भारतातील बंदरे, अणुप्रकल्प, औष्णिक ऊर्जा प्रकल्प आदी संवेदनशील ठिकाणी घातपात घडविण्याची शक्यता असल्याने केंद्रसरकारकडून सतर्कतेचे इशारे देण्यात आले आहेत.अनेक दहशतवाद्यांना लाहोर, शेखपूरा, फैसलाबाद येथील कालवे येथे पोहण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असून समुद्रीमार्गे घुसखोरी करून एखाद्या जहाजावर कब्जा मिळवून भारताचा किनारा गाठण्याचे त्यांचे मनसुबे असल्याचे गुप्तचर यंत्रणेने कळविले आहे.

यामुळे किनारपट्टीवरील सुरक्षा अधिक मजबूत करण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाची धूम सुरू असल्याने गर्दीचा फायदा घेऊन घातपात घडविण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई वरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर समुद्रातील सुरक्षा यंत्रणेचे पितळ उघडे पडले होते. या सुरक्षा यंत्रणेतील उणिवा दूर करण्यासाठी शासनाने हॉवरक्राफ्ट स्पीडबोटी खरेदी करून संशयास्पद हालचाली रोखण्यासाठी सागरी पोलीस स्थानके उभारण्यात आली होती. किनारपट्टीसह समुद्रातील १२ नॉटिकल पर्यंतच्या क्षेत्राच्या सुरक्षिततेची परवानगी इतर विभागासह देण्यात आली होती. अधिक वृत्त/२नाचविले फक्त कागदी घोडेसध्या हे क्षेत्र कमी करण्यात आले असले तरी सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या देखरेखी खाली ८ उपनिरीक्षक, ७ सहाय्यक उपनिरीक्षक, १४ हवालदार, ४२ शिपाई, २ सारंग, २ इंजिन चालक, ४ खलाशी, असा ७९ पोलिसांचा स्टाफ मंजूर करून १ हेलीकॉप्टर, १ स्पीड बोट, अत्याधुनिक रायफल्स, सर्च लाईट, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आदी गोष्टीची पूर्तता करण्याचे आदेश काढण्यात आले होते.सद्यस्थितीत हे आदेश फक्त कागदोपत्रीच उरले असल्याचे दिसून येत असून अनेक पोलीस स्थानकांना आजही अपुऱ्या पोलीस व अधिकाºयांच्या तुटपुंज्या बळावर सुरक्षेचा गाडा हाकावा लागत आहे. याबाबत वारंवार आवाज उठवूनही गृहखाते त्याला दुर्लक्षितआहे.

टॅग्स :Sea Routeसागरी महामार्ग