शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
3
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
4
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
5
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
6
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
7
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
8
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
9
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
10
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
11
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
12
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
13
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
15
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
16
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
17
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
18
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
19
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
20
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी

अनेक गावांना उधाणाचा धोका

By admin | Updated: April 15, 2016 01:16 IST

एप्रिल पासून सुरू होणारे समुद्रातील उधाण, चार महिन्यात होणारा धुवाँधार पाऊस, त्यातच येणाऱ्या महाकाय भरतीमुळे डहाणूच्या किनाऱ्यावरील मच्छीमारांच्या घरांना धोका निर्माण झाला

डहाणू : एप्रिल पासून सुरू होणारे समुद्रातील उधाण, चार महिन्यात होणारा धुवाँधार पाऊस, त्यातच येणाऱ्या महाकाय भरतीमुळे डहाणूच्या किनाऱ्यावरील मच्छीमारांच्या घरांना धोका निर्माण झाला असून चिंचणी ते बोर्डीपर्यंतच्या किनाऱ्यावर संरक्षक बंधारा बांधण्याच्या मागणीकडे मेरीटाईम बोर्ड तसेच शासन दुर्लक्ष करीत असल्याने हजारो मच्छीमार बांधवांत संताप व्यक्त होत आहे. पावसाळ्यात आपल्या घरांचे काय होईल या भीतीने गोरगरीब मच्छीमार, खलाशी धास्तावले आहेत.गेल्या आठ दिवसांपासून डहाणू समुद्रकिनाऱ्यालगतच्या मच्छीमार पाड्यांच्या वस्तीला समुद्राच्या लाटांचा सामना करावा लागत आहे. डहाणूचा धूपप्रतिबंधक बंधारा फुटल्याने समुद्राच्या लाटांच्या मारा थेट वस्तीवर होत आहे. त्यामुळे धा. डहाणू, सोनापूर, मांगेळआळी, किर्तने बंगला, दुबळपाडा, सतीपाडा, पारनाका, आगर इ. ठिकाणच्या मच्छीमारांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांची धावपळ उडाली होती. गेल्या वर्षी हाय टाईड मुळे कल्पना महेश राठोड या विधवा निराधार महिलेचे घर उध्वस्त झाले होते. त्यावेळी तहसिलदार नगरपरिषद प्रशासनाने तेथे भेट देऊन त्यास सरकारी आर्थिक मदतीबाबतीत आश्वासने दिली होती. मात्र तिला अद्यापी काहीही मदत मिळालेली नाही. विशेष म्हणजे समुद्राच्या लाटांमुळे येथील धूप प्रतिबंधक बंधारे जमीनदोस्त झाले आहेत. तरीही येथे प्रशासनाने कोणतीच उपाययोजना केली नसल्याने भरतीचे पाणी गावाची वेस ओलांडून रहिवाशांच्या घरात घुसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान गेल्या दोन, तीन वर्षापासून खवळलेल्या समुद्राच्या महाकाय लाटा किनाऱ्यावर आदळत असल्याने चिंचणीपासून थेट बोर्डीपर्यंतच्या किनाऱ्याची प्रचंड धूप होत असून किनारा पूर्णत: खचला आहे. (वार्ताहर) येत्या दोन, तीन वर्षात पावसाळ्यात अशीच धूप होत राहिली तर येथील मच्छीमारांची घरे, सुरूंची बने तसेच सौदर्य जमीनदोस्त होण्याची भीती पंचायत समितीचे सदस्य तसेच मच्छीमार नेते शिवदास अंभिरे तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मर्दे यांनी व्यक्त केली. येथील किनाऱ्यावरील धूप रोखण्यासाठी प्रतिबंधक बंधारा बांधण्याची गरज असतानाही मेरीटाईम बोर्ड तसेच पर्यटन विकास महामंडळ याकडे दुर्लक्ष करीत असल्याने मच्छीमार, नागरीक तसेच पर्यटकांत नाराजी व्यक्त केली जात आहे. किनारपट्टीवरील भूमिपुत्रांचा बळी गेल्या शिवाय जागे व्हायचेच नाही असे सरकारने ठरवले आहे काय असा संतप्त सवाल भूमिपुत्र करीत आहेत.