शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगड तालुक्यातील अनेक भागातील भातरोपे कुजली, शेतकऱ्यांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 00:15 IST

विक्रमगड तालुक्यात ९० टक्के भात लावणी पूर्ण झाली आहे. मात्र, सतत पाऊस पडत असल्याने शेतात पाणी भरून रोपे पाण्यात बुडली आहेत.

विक्रमगड : विक्रमगड तालुक्यात ९० टक्के भात लावणी पूर्ण झाली आहे. मात्र, सतत पाऊस पडत असल्याने शेतात पाणी भरून रोपे पाण्यात बुडली आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांची रोपे कुजली आहेत. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास भातशेतीला धोका निर्माण होऊन गेल्या काही वर्षांत जसे भातिपकाचे नुकसान झाले होते तशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.विक्रमगड तालुक्यासह खुडेद, ओंदे, शील, झडपोली, केव, म्हसरोली, सजन आदी भागांतील शेतीचे बांध पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने शेतीसह वाहून गेले आहेत. तर काहींच्या शेतात माती आल्याने भात पिके गाडली आहेत. अनेकांची भातशेती पाण्याखाली तसेच जास्त पावसामुळे लागवडीखालील भातरोपे कुजण्याचा संभव असून त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होण्याची चिन्हे आहेत. नुकसान झालेल्या शेतकºयांच्या भात पिकाचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.सततच्या पावसाने माझ्या शेतातील भात पीक कुजले आहे. जर पावसाचे प्रमाण असेच राहिले तर भातिपकाची नासाडी होईल. वारंवार शेतकरी संकटात येत असून निसर्गाच्या या लहरीपणामुळे दिवसेंदिवस भातशेती करणे जिकिरीचे होते आहे. पुढील काळात जर अशीच परिस्थिती राहील्यास भातशेतीचे क्षेत्र कमी होण्याची चिन्हे आहेत. आज पारंपारिक व या भागात भातशेती हेच मुख्य पिक असल्याने शेतकरी करीत आहे. परंतु खर्च करु न जर पदरात निराशा पडत असेल तर शेतकºयांनी करायचे काय? - गजानन देऊ जाधव (शेतकरी)

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर