शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
2
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
3
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
4
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
5
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
6
या कंपनीला AI वरील अहवाल देणे महागात पडले; ऑस्ट्रेलियाला द्यावा लागला भरमसाठ दंड
7
Shopping: शॉपिंग हा खर्च नाही, तर ही आहे तुमच्या भविष्याची खास गुंतवणूक; कशी ते पहा!
8
Test Rankings: आयसीसी टेस्ट क्रमवारीत बुमराहची बादशाहत कायम; मोहम्मद सिराजचेही मोठी झेप!
9
गुंतवणूकदार 'गार', टांगा पलटी घोडे फरार...! बाजारात येताच 40% आपटला शेअर, लोकांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
10
EPFO सदस्यांना मोफत मिळतो लाखो रुपयांचा लाईफ इन्शुरन्स कव्हर! काय आहे EDLI योजना?
11
Max Life पेन्शन फंडाचा परवाना रद्द; लोकांच्या पैशाचं काय होणार? जाणून घ्या
12
Video - देवदूत! भूस्खलनानंतर रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी डॉक्टरने स्वत:चा जीव घातला धोक्यात
13
“PM मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी”: वडेट्टीवार
14
खान कुटुंबात आली परी! अरबाज खान लेकीला घेऊन निघाला; रुग्णालयाबाहेरील व्हिडीओ व्हायरल
15
शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना दिलासा नाही! ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणी अडचणी वाढल्या; न्यायालयाने दिले हे आदेश
16
शेतकऱ्याने तहसील कार्यालयात घेतले विष, खासदार प्रतिभा धानोरकरांवर गंभीर आरोप; मृतदेह स्वीकारण्यास नकार
17
“ठाकरेंची बाजू अतिशय भक्कम, ज्यांची कमकुवत ते प्रकरण पुढे ढकलायचा प्रयत्न करतात”: असीम सरोदे
18
आजपासून पिनसोबतच चेहरा अन् बोटांचे ठसे वापरूनही करा यूपीआयवरून व्यवहार; फसवणुकीला आळा बसणार
19
नात्याला काळीमा! सासूच्या प्रेमात वेडा झाला जावई; पत्नीची केली हत्या, प्रायव्हेट फोटो व्हायरल
20
'डिजिटल अरेस्ट' पासून कसे वाचायचे? समन्स खरे की खोटे असे ओळखा; ईडीने सगळीच माहिती सांगितली

पालघरच्या जंगलातील वणवे मानवनिर्मित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 23:44 IST

पर्यावरणरक्षकांकडून कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क पालघर : पालघर, ठाणे जिल्ह्यांतील डोंगराला एकाच आठवड्यात अनेक ठिकाणी लागलेले वणवे मानवाने लावले असल्याने या मागच्या षड् यंत्राचा शोध वनविभाग पोलिसांनी लावून वनपरिक्षेत्र आणि त्यावर सहवास करणाऱ्या जीवांना उद्ध्वस्त करणाऱ्याविरोधात कडक कारवाईची मागणी पर्यावरणरक्षकांकडून केली जात आहे. वनपरिक्षेत्रातील प्लॉट मोकळे व्हावे, कोळशाची उपलब्धता व्हावी, तसेच शिकार करता यावी, आदी अनेक कारणांसाठी जंगलात वणवे लावले जात असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे.

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्याला २४ हजार हेक्टर क्षेत्राची वनसंपदा लाभली असून अनेक दुर्मीळ जातीचे, वनौषधीचे वृक्ष असून जवळ असलेल्या कोहोज किल्ल्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नव्याने करण्यात आलेली वृक्षारोपणातील झाडे नुकत्याच लागलेल्या आगीत नष्ट झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मनोर, विक्रमगड, सफाळे तर ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरी, पडघा, कुहे, चिंबीपाडा, दिघाशी, कांबा आदी भागांतील वनपरिक्षेत्रात वणवे लावण्याचे प्रकार एकापाठोपाठ घडत आहेत. हे वणवे मानवनिर्मित असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून केला जात असून या मागच्या सूत्रधाराचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी प्रो. भूषण भोईर यांनी केली आहे. 

पालघर, ठाणे जिल्ह्यांच्या अनेक वनक्षेत्रांत बिबटे, रानडुक्कर, मोर, ससे, माकडे आदी प्राणी-पक्ष्यांचा सहवास असून या आगीमुळे त्यांच्या अधिवासाची ठिकाणे नष्ट होणार आहेत. मागच्याच आठवड्यात ९ मार्चला पालघरजवळील चहाडे, लालठाणे येथील डोंगरावर वणवा लावण्यात आला होता. 

डोंगरावर अनेक भागांत लागलेल्या आगींवरून हा वणवा मानवनिर्मित असल्याचे सिद्ध होत आहे. या आगीतून निर्माण होणारा कोळसा शहरात विकला जात आहे. यासंदर्भात वनविभाग गंभीर नसल्याचे निदर्शनास येत असून त्यांची गस्ती पथके याआगी लावण्याच्या प्रकारांना आळा घालण्यास अपयशी ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे.  

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघरfireआग