शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Lockdown : वसईत संचारबंदीचे तीनतेरा, अन्यत्र चांगला प्रतिसाद; विरार, नालासोपारा रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 23:36 IST

Maharashtra Lockdown: विरार आणि नालासोपारा रेल्वे स्थानकात तर प्रवाशांनी सकाळपासूनच गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. लॉकडाऊनचा पहिलाच दिवस नागरिकांनी अक्षरश: धाब्यावर बसवल्याने लॉकडाऊनचे तीनतेरा वाजले.

विरार/पारोळ : कोरोनाची साखळी तुटावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते ३० एप्रिलपर्यंत संचारबंदीचे आदेश दिले आहेत. मात्र, वसई - विरारमध्ये मुख्यमंत्र्यांचे आदेश धाब्यावर बसवल्याचे दिसून आले. पहिल्याच दिवशी लॉकडाऊनचे तीनतेरा वाजले. अपुऱ्या बळामुळे पोलीस हैराण झाले असून, ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात नसल्याने नागरिकांचा मुक्त संचार सुरू होता.विरार आणि नालासोपारा रेल्वे स्थानकात तर प्रवाशांनी सकाळपासूनच गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. लॉकडाऊनचा पहिलाच दिवस नागरिकांनी अक्षरश: धाब्यावर बसवल्याने लॉकडाऊनचे तीनतेरा वाजले. संचारबंदीत नागरिकांच्या वावरावर बंदी असताना नागरिक मात्र कशाचीही तमा न बाळगता बिनधोकपणे फिरत असल्याचे दिसून आले. शासनाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त असणे गरजेचे होते. मात्र, तसा पोलीस बंदोबस्तही कोठे दिसून आला नाही. अनेक पोलिसांनाच कोरोनाची लागण झाल्याने पोलीस बळाची वानवा दिसून आली. त्यामुळे सध्याच्या संचारबंदीत आणि वाढत्या गुन्ह्यांच्या आलेखावर नियंत्रण ठेवण्याची कसरत पोलिसांना करावी लागत आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारीदेखील हैराण झाले आहेत.संचारबंदीत वाणसामानाची अडचण होऊ नये म्हणून नागरिकांनी सकाळपासूनच  रेशन दुकानांत गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. रेशन दुकानांत रेशन घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांची गर्दी पाहता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या संचारबंदीच्या आदेशाची वसईत अक्षरश: पायमल्ली झाल्याचे दिसून आले. दरम्यान, वसईतील कोरोनाचा उद्रेक मोठा आहे. त्यामुळे शासनाने दिलेले आदेश शिरसावंद्य मानून नागरिकांनी कठीण काळात जबाबदारीने वागणे संयुक्तिक आहे. परंतु तशी वर्तणूक बहुसंख्य वसई-विरारकरांकडून होताना दिसली नाही.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस