शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : सोशल मीडियावर प्रचाराला जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 05:46 IST

वसई तालुक्यात वसई, नालासोपारा, बोईसर या विधानसभा मतदार संघाचे क्षेत्र येत असल्याने शहरी भागाबरोबर ग्रामीण भागही या तीनही मतदार संघांशी जोडला गेला आहे. प्र

पारोळ : वसई तालुक्यात विधानसभा निवडणूक प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून आता थेट प्रचारापेक्षा सोशल मीडियाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. उमेदवार सोशल मीडियावर जास्त भर देऊ लागल्याने प्रचाराचे हे नवे माध्यम प्रभावी ठरताना दिसते आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप यावर आता प्रचाराचा धुराळा उडताना दिसत आहे.वसई तालुक्यात वसई, नालासोपारा, बोईसर या विधानसभा मतदार संघाचे क्षेत्र येत असल्याने शहरी भागाबरोबर ग्रामीण भागही या तीनही मतदार संघांशी जोडला गेला आहे. प्रचारासाठी आता अवघे काही दिवस उमेदवारांच्या हातात असल्याने प्रत्येक मतदाराला भेटणे शक्य नाही. मात्र, आता बहुतेक मतदारांकडे स्मार्टफोन असल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचता येते. यासाठी उमेदवारांनी वॉर रूम सुरू केले आहे. या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधून आपल्या पारड्यात मते पाडून घेण्याचा प्रयत्न उमेदवार सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहेत.सोशल मीडियाच्या माध्यमातूून वाढत चाललेले प्रचाराचे प्रमाण लक्षात घेता, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळेच धार्मिक भावना दुखावणे, समाजात तेढ निर्माण करणारी माहिती प्रसारित केली, तर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.जुने चित्र बदलतेय : निवडणूक म्हटले की, ध्वनिक्षेपकांच्या माध्यमातून केले जाणारे आवाहन, उमेदवारांची पायपीट आणि छोट्या-मोठ्या सभांतून उडणारा प्रचाराचा धुरळा, हेच चित्र समोर येते. मात्र, आता हे चित्र बदलताना दिसते आहे. सोशल मीडियाचे वाढते प्रस्थ लक्षात घेता आता बहुतेक निवडणूक प्रचारासाठीही या माध्यमाचा चांगलाच वापर केला जात आहे.

टॅग्स :vasai-acवसईnalasopara-acनालासोपाराboisar-acबोईसर