शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Day 2021: पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 09:52 IST

Maharashtra Day 2021: कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर यंदाही महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देध्वजारोहण कार्यक्रमानंतर पालकमंत्री भुसे खासदार राजेंद्र गावित यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजना बाबतीत पुन्हा एकदा चर्चा केली.

- आशिष राणे

वसई : महाराष्ट्र राज्याच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करून कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर यंदाही महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.

या ध्वजारोहण समारंभाला पालघर जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जि.पं.चे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे ,पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे उपस्थित होते. दरम्यान, या समारंभासाठी पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित ,पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा, निवासी उपजिल्हाधिकारी किरण महाजन आदी महसूल, जिल्हा परिषद व पोलीस दलातील निवडक अधिकारी देखील उपस्थित होते.

या प्रसंगी पालकमंत्री दादाजी भुसे यांना पालघर पोलीस दलाने मानवंदना दिल्यानंतर पालकमंत्री भुसे यांनी महसूल विभागासहित सर्व प्रशासकीय विभागाचे कर्मचारी अधिकारी वर्गास महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पालकमंत्री भुसे खासदार राजेंद्र गावित यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजना बाबतीत पुन्हा एकदा चर्चा केली.

कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर अतिशय काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आणि साधेपणाने करण्याचा निर्णय शासनाने यंदाही दुसऱ्या वर्षी घेतला आहे. शासनाचे हे सर्व निर्देश पाळत येथील पालघर  जिल्हाधिकारी कार्यालयात हा ध्वजारोहण कार्यक्रम साधेपणाने साजरा झाला. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार