शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

वसईतील खाजगी शाळांमधून लूटमार

By admin | Updated: May 27, 2017 02:04 IST

वसईतील खाजगी शाळाचालक शिक्षण शुल्कांच्या नावाखाली विद्यार्थी आणि पालकांची भरमसाठी लुट करीत असल्याची तक्रार भाजपाचे जिल्हा

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : वसईतील खाजगी शाळाचालक शिक्षण शुल्कांच्या नावाखाली विद्यार्थी आणि पालकांची भरमसाठी लुट करीत असल्याची तक्रार भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राजन नाईक यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. वसई विरार महापालिका हद्दीत दोनशेहून अधिक खाजगी शाळा आहेत. यातील काही शाळा अनधिकृत आहेत. तर अधिकृत शाळांमध्ये मुलांना खेळण्यासाठी पटांगण नाही. शाळेत विद्यार्थ्यांना पुरेशा सोयी सुविधा नाहीत. मात्र, असे असताना त्या भरमसाठी शिक्षण शुल्क आकारीत आहेत. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम फी, सक्तीची सहल शुल्क, स्रेहसंम्मेलन शुल्क, संगणक प्रशिक्षण शुल्क, अ‍ॅक्टीव्हीटी फी, स्पोर्ट फी, ग्रुप फोटो फी, मिसलेनियस फी आदींच्या नावाखाली शुल्क वसुल केली जाते. यावर कहर म्हणजे बहुतेक शाळांमधून गणवेश आणि वह्या पुस्तके घेण्याची सक्ती केली जात आहे. किंवा शाळा सांगेल त्याच दुकानातून खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे पालकांना बाजारभावापेक्षा तीनपट अधिक पैसे खर्च करावे लागत असल्याचा नाईक यांचा आरोप आहे. गांभिर्याची बाब म्हणजे शाळेत भरणा केलेल्या डोनेशन व इतर फीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात रक्कम रोखीने स्विकारली जात असून स्विकारण्यात आलेल्या पूर्ण रकमांची पोचपावती मिळत नाही. तसेच काही तुरळक फी वगळता इतर शुल्क रोखीनेच भरण्याची सक्ती करण्यात येत असल्याची नाईक यांनी तक्रार केली आहे. अनेक शाळांमध्ये सक्षम गुणवत्ताधारक शिक्षकांचा अभाव आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडेच ट्युशनला जाण्यासाठी बंधने घातली जातात. शाळेतील असलेल्या बसेसमध्ये संस्थाचालकांची भागिदारी अथवा कमिशन ठरलेले असते. त्यामुळे बस चालक ठरवतील तितकेच भाडे देण्याशिवाय पालकांना मार्ग नसते. असोसिएशनच्या संगनमताने संस्था चालक स्वत:च्या आर्थिक फायद्याचे निर्णय घेत असल्याकडेही नाईक यांनी शिक्षणमंत्री तावडे यांचे लक्ष वेधले आहे.