शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील पडघा टोलनाक्यावर वाहनांच्या लांबचलांब रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 23:34 IST

नितिन पंडित  भिवंडी : टोलनाक्यांचे माहेरघर म्हणून भिवंडीची नवी ओळख निर्माण झाली आहे. मुंबई ठाण्यापासून जवळ असलेल्या भिवंडीत ठाणे ...

नितिन पंडित भिवंडी : टोलनाक्यांचे माहेरघर म्हणून भिवंडीची नवी ओळख निर्माण झाली आहे. मुंबई ठाण्यापासून जवळ असलेल्या भिवंडीत ठाणे, वाडा , वसई, नाशिक , कल्याण कुठूनही यायचे झाले तरी टोल भरावा लागतोच,  अशी परिस्थिती भिवंडीत आहे. आता केंद्र सरकारने वाहनांना फास्टॅग लावणे अनिवार्य केल्याने येथील स्थानिक वाहन चालकांसह प्रवासी वाहन चालकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र या फास्टॅगमुळे टोल कर्मचारी व वाहनचालक यांच्यात मोठ्या प्रमाणात वाद होत असून टोलनाक्यांवर फास्टॅग मुळे वाहनांच्या लांबचलांब रांगा लागत आहेत. 

पडघा टोलनाक्यावर फास्टॅगमुळे वाहनांच्या रांगा लागत असल्याने वाहन चालक हैराण होत आहेत. मात्र टोल कंपनी केंद्र शासनाचे निर्देश पुढे करून नागरिकांकडून टोल वसूली करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहे. मुंबई नाशिक महामार्गावर असलेल्या पडघा टोलनाक्यावर शनिवार व रविवारी सुट्टी असल्याने शिर्डी, नाशिककडे जाणाऱ्या व तेथून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांची गर्दी जास्त असते. इतर दिवसांपेक्षा शनिवार व रविवार या दोन दिवसांत या टोलनाक्यावर वाहनांची मोठी गर्दी असते; मात्र आजपर्यंत ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पडघा टोलनाक्याकडून ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांना टोलनाक्यावर एक ते दोन तास ताटकळत राहावे लागते.

केंद्र सरकारने वाहनांना फास्टॅग लावण्याचे निर्देश दिल्याने पडघा टोलनाक्यावर सध्या सर्व लाईन फास्टॅगच्या करण्यात आल्या आहेत. मात्र स्थानिक नागरिकांचा टोल भरण्यास विरोध असल्याने टोलनाक्यावर अनेकवेळा वाद होतात. फास्टॅग ऑनलाइन असल्याने स्थानिक वाहन चालकांसाठी सिस्टीम मॅन्युअल करावी लागते. यात ५ ते ६ मिनिटे जातात. त्यामुळे गर्दी वाढते. स्थानिकांना टोलमध्ये सूट मिळावी म्हणून गाडीचे पेपर टोलनाक्याकडे जमा केल्यास फक्त १० टक्केच टोल भरावे लागतो. मात्र १० टक्के टोल भरण्यासदेखील स्थानिकांचा विरोध असल्याने त्यांची समजूत काढण्यात वेळ वाया जातो.

परिणामी टोलनाक्यावर वाहनांची गर्दी वाढते. ज्यांच्या जमिनी रस्त्यासाठी बाधीत झाल्यात अशांसाठी टोल कंपनी सहानुभूती दाखविणार आहे. मात्र कुणीही स्थानिक नागरिक म्हणून सांगतो, त्यांच्याकडे पेपर मागितले की स्थानिक पुराव्याचे पेपर देण्यास वाहन चालक टाळाटाळ करतात. त्यामुळे टोल नाक्यावर भांडणतंटे होतात.

सध्या शासनाने नागरिकांना फास्टॅगसंदर्भात जनजागृतीसाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. त्यानंतर पोलीस प्रशासनास हाताशी धरून टोलवसुली मोहीम राबविली जाईल. त्यामुळे सर्व नागरिकांनी आपल्या वाहनांना फास्टॅग लावणे गरजेचे आहे. त्यामुळे टोलनाक्यावरील वेळ वाचेल, असे मत पडघा टोलनाक्याचे व्यवस्थापक बाबूभाई शेख यांनी व्यक्त केले आहे.  पडघा टोलने वेळेचे नियोजन करून नागरिकांचा वेळ वाचवावा अशी प्रतिक्रिया वाहन चालक तेजस चव्हाण, ॲड. कल्पेश पाटील यांनी दिली आहे. तर फास्टॅग नसल्याने टोलवसुली दुप्पट करणे चुकीचे आहे अशी प्रतिक्रिया संदेश श्रीराम पाटील यांनी दिली आहे. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीthaneठाणे