शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आपटी गावात साजरा होतो उत्सवाचा ‘लोकमान्य’ आदर्श; एक गाव एक गणपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 02:14 IST

गेली ४६ वर्षे ही संकल्पना अव्याहत सुरू असून गावातील सर्व गावकरी एकत्रित येऊन हा गणेशोत्सव साजरा करतात.

राहुल वाडेकर

विक्रमगड : घरगुती पातळीवरील गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात सुरू करण्याच्या लोकमान्य टिळकांच्या संकल्पनेमागे समाज एकजुटीकरणाची भावना होती. हीच भावना जपत विक्रमगड शहरानजीकचे एक गाव गेल्या ४६ वर्षापासून ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना यशस्वीरीत्या राबवीत आहे. संपूर्ण गावात एकाच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून आपटी बु. गावाने ऐक्याचा संदेश दिला आहे. दरम्यान, तालुक्यातील झडपोली, गावितपाडा, सवादे, खुडेद आदी अनेक ठिकाणीही ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना राबविली जात आहे.

कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता गणेशोत्सवापूर्वी विक्रमगड पोलीस कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या गाव-पाड्यांतील व्यापारी, पोलीस पाटील, नागरिक, राजकीय पक्षाचे पुढारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी तालुक्यातील खेड्यापाड्यांत ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबविण्याचे व गावामध्ये गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग राखण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार तालुक्यात अनेक भागात ही संकल्पना राबविली जात असून या वर्षी ‘एक गाव एक गणपती’ संकल्पनेमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे.

विक्रमगड मुख्य बाजारपेठ (शहरापासून) ८ कि.मी. अंतरावर हे आपटी बु.गाव आहे. गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना गावकरी सार्वजनिक नवतरुण मित्र मंडळाच्या माध्यमातून तब्बल ४६ वर्षे निष्ठापूर्वक भक्तिभावाने व एकोप्याने राबवीत आहेत. गणेशोत्सव चालू करण्यामागचा लोकमान्यांचा उद्देश गावकऱ्यांनी सफल करून दाखविला आहे. त्याअनुषंगाने इतर गावांनीही ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली असून दरवर्षी यामध्ये वाढ होताना दिसत आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे.१९७० साली नवतरुण, शिक्षक व प्रतिष्ठित नागरिक यांनी गावात एकाच गणेशमूर्तीची स्थापना केली. त्यास ४६ वर्षांचा काळ लोटला असून आजही ही संकल्पना राबविली जात आहे. यातून आपली एकजूट कायम राहील असा विचार मांडला, असे नवतरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्याला सरपंच, पोलीस पाटील यांनीही दुजोरा देत ही संकल्पना उचलून धरली. या अनुषंगाने सरपंच, पोलीस पाटील, गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी आपटी बु. ग्रामस्थांचे सार्वजनिक असे नवतरुण मित्र मंडळ स्थापन करून ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली.

गेली ४६ वर्षे ही संकल्पना अव्याहत सुरू असून गावातील सर्व गावकरी एकत्रित येऊन हा गणेशोत्सव साजरा करतात. मात्र यंदा या एकजुटीच्या उत्सवावर कोरोना संसर्गामुळे विरजण पडले. या गावाची लोकसंख्या एक हजार पाचशे आसपास आहे. गावाने एक गाव एक गणपती संकल्पना राबवून सामाजिक एकात्मेचा आदर्श उभा केला आहे. त्याचप्रमाणे या आदर्शचा दुसरा भाग म्हणजे तालुक्यातील झडपोली, गावितपाडा, सवादे, खुडेद आदी अनेक ठिकाणीही एक गाव एक गणपतीची संकल्पना राबविली जात आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सव