पालघर : तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या केळवा बीच यथे ग्राम पंचायतीने आकारलेल्या प्रवेश शुल्क आणि पार्कींग शुल्कातून स्थानिकांना वगळावे ह्यासाठी आंदोलन करण्यात आले. केळवेरोड रेल्वे स्थानाकातून प्रवासी घेऊन येणाऱ्या सहा आसनी रिक्षा तसेच दुचाकी व चार चाकी वाहनावर प्रवेश शुल्क व पार्र्किं गकर आकारणी करण्यास ग्राम पंचायतीने सुरूवात केल्याने त्या विरोधात तालुक्यातील नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली असून त्या विरोधात आज सकाळी आंदोलन करण्यात आले, तालुक्यासह बाहेरून येणाऱ्या नागरिकांवर तसेच वाहनावर कर आकारणी करण्यात येते. त्यातून गावात राहणाऱ्यांनाच केवळ ही सूट देण्यात येते. बीचवर येणाऱ्या प्रत्येकाना समान न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली, आज सकाळी केळवे गावातून येणाऱ्या नागरीकांना त्यांच्या गाड्या केळवरोड रेल्वे स्थानकाच्या पार्किंग व्यतिरिक्त इतरत्र पार्क करण्यास केळवे रोड व तालुक्यातील नागरिकांनी आंदोलन करून मज्जाव केला. केळवे ग्राम पंचायतीचे नाक दाबून तोंड उघडण्याचा प्रयत्न केला गेला.जिप सदस्य योगेश पाटील,डॉ.मंगेश पाटील, प्रकाश सावर, रंजन जोशी, संजय चौधरी, सचिन भोईर, संदिप किणी, उपेश घरत यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी ह्या आंदोलनात सहभाग घेतला. (वार्ताहर)
प्रवेश शुल्काविरोधात स्थानिकांचे आंदोलन
By admin | Updated: March 23, 2017 01:13 IST