शहरं
Join us  
Trending Stories
1
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
2
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
3
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
4
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
5
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
6
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
7
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
8
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
9
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
10
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
11
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
12
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
13
Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी अपडेट, चौथी संशयित कार जप्त, कुठं सापडली? 
14
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
15
बिहार विधानसभा निकालापूर्वी गुंतवणूकदार सावध? बाजार सपाट बंद; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
16
Vastu Tips: तिजोरीत स्थिर लक्ष्मी हवी? घरात करा हे ६ बदल, पैसा टिकेल आणि वाढेलही!
17
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
18
एसबीआयला ४,४०० रुपयांचा चुकीचा दंड लावणे महागात! आता द्यावी लागणार १.७० लाख रुपये भरपाई
19
IPL 2026: शेन वॉटसनचे आयपीएलमध्ये पुनरागमन, 'या' संघाशी जुडलं नाव!
Daily Top 2Weekly Top 5

धुवाधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 00:37 IST

जून महिन्याच्या तिसऱ्याच आठ्वड्यात सुरु झालेल्या दमदार पावसामुळे बळीराजासह जिल्हावासिय सुखावले असले तरी सोमवार पासून पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ

पालघर : जून महिन्याच्या तिसऱ्याच आठ्वड्यात सुरु झालेल्या दमदार पावसामुळे बळीराजासह जिल्हावासिय सुखावले असले तरी सोमवार पासून पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातल्याने अनेक ठिकाणी पाणी साचून रेल्वे, बस आदी सेवेवर परिणाम झाला. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असल्याने दररोज वेळेवर लोकल पकडणाºया चाकरमान्यांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लेटमार्क बसला.जिल्ह्यात सोमवार पर्यंत १४५.३ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. या दिवसात सर्वाधिक पाऊस तलासरी तालुक्यात झाला असून २१०.२ मिमी इतकी नोंद झाली आहे तर सर्वात कमी पावसाची नोंद मोखाडा तालुक्यात २७.६ मिमी इतकी झाली आहे. तलासरी खालोखाल डहाणू तालुक्यात १७४.७ मिमी, वसई तालुक्यात १७३ मिमी, विक्र मगड तालुक्यात १५२.५ मिमी, जव्हार तालुक्यात १३० मिमी, तर वाडा तालुक्यात १०१ मिमी पावसाची नोंद झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. तीन दिवस सतत पडत असलेल्या पावसाने जिल्ह्यातील धामणी, कवडास व वांद्री धरणाच्या पाणीसाठ्याच्या पातळीत वाढ होऊ लागली असून यातील कवडास धारण १०० टक्के भरलेले आहे. कवडास धरणाची पाणीसाठा क्षमता ९.९६ दलघमी इतका असून तो पूर्णपणे भरला आहे. धामणी धरणाच्या पाणीसाठ्याची एकूण क्षमता २७६.३५ दलघमी इतकी असून त्यापैकी ते १००.४४ दलघमीने भरले आहे.याची टक्केवारी सुमारे ३६ टक्के आहे. वांद्री धरणाचा एकूण पाणीसाठा क्षमता ३५.९४ दलघमी इतका आहे. त्यापैकी सोमवारपर्यंत म्हणजे अवघ्या तीन दिवसात हे धरण ६.८३ दलघमीने म्हणजे १८.९९ टक्क्याने भरले आहे.तलासरी : भागात रविवारी रात्री पासून पडणार्या संततधार पावसाने नदी नालेदुथडी भरून वाहू लागले तसेच रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक बंद पडली आजच्या पावसाने जनजीवन च विस्कळीत झाले त्याचा फटका पदवीधर मतदारसंघाच्या मतदानावरही झाला. तलासरी उंबरगावं मार्गावरील झारीखडी नदी च्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने यामार्गावरीळ वाहतूक बंद पडली सोमवार तलासरी आढवडा बाजाराचा दिवस पण हा बाजारही पावसा मुले भरला नाही.कासा : डहाणू तालुक्यातील कासा भागात रविवार रात्री पासून जोरदार सुरु झालेला पाऊस सोमवारी दिवस भर सुरूच होता.पावसाचा जोर कमी न झाल्याने नदी नाल्याच्या मोठा पूर आला होता. कासा भागात रस्त्यावर ही पाणी साचले होते. त्यामुळे बाजारपेठे दिवस भर शुकशुकाट होता. तर सूर्या नदीला पूर आल्याने ग्रामीण भागात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.बोईसर : तारापूर सह परिसरातील गावांमध्ये शनिवारीपहाटेपासून सुरू झालेला पावसाची सततधार आजही कायम असून बोईसर मंडळक्षेत्रात तीन दिवसांमध्ये ५८२ मि. मी. पाऊस होऊन मुसळधार पावसाने शहरासह परिसराला अक्षरश: झोडपले असून विस्कटलेल्या जनजीवनाबरोबरच नागरिकांची पावसाने अक्षरश: त्रेधारितरपीट उडविली आहे.मनोर : गेल्या तीन दिवसा पासून सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने मनोर परिसरातील वैतरणा, देहरजा, सूर्या, हाथ, पिंजाळ या नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या आहेत. तर शेताला तलावाचे स्वरूप आले होते. त्यातच मनोर पालघर रस्त्यावर वाघोबा खिंड येथे डोंगरावरून धोधो पाणी पडत असल्याने आगामी काळात पर्यटकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. मुसळधार सुरुच असल्याने पेरणीचे काम थांबले आहे.पारोळ :मुंबई-अहमादाबाद महामार्गावरील पाणी सोमवार सकाळपासून वाढायला लागले होते. त्यामुळे मुंबई व गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्ण थांबून त्याठिकाणी तासंन तास मोठ्या रांगा लागल्या होत्या. तर पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी ओसरायला वाहनचालकांना मोठा विलंब लागला. वसई महामार्गावर गुडघाभर तर काही ठिकाणी कंबरे एवढे पाणी साचल्याने सोमवारी दिवसभर वाहतुकीचा मोठा खेळखंडोबा झाला होता.विक्रमगड : तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होता. पाऊस लांबला असला तरी काल पासुन पावसाने जोर पकडला आहे. या मुसळदार पावसा मुळे शेतकरी खुश असलातरी पेरण्या मात्र खोळंबल्या आहे. हा पासून उघड झाप करणारा पाऊस पाहिजे असे मत काही शेतकºयांचे आहे. या पावसामुळे शेत पुर्ण पाण्याखालील गेली आहे. त्यामुळे हा पाऊस लागवडीचा असल्याचे मत शेतकºयांना सांगितले. तालुक्यात हळवा, निमगरवा, व गरवा भात शेती केली जाते या. या पावसामुळे शेतीची कामे खोळबली.डहाणू : डहाणू तालुक्यात आज प्रचंड पाऊस झाल्याने नदी, नाले, तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. रस्त्यावर पुर आल्याने सर्व प्रकारची वाहतूक बंद पडली त्याच बरोबर शाळा, महाविद्यालयाचे आणि कर्मचाºयाचे प्रचंड हाल झाले. गेल्या चोवीस तासात सोमवार सकाळी आठ वाजे पर्यंत डहाणूत ३२५ मि.मी. पावसाची नोंद झाली. वाणगाव देदाळे रस्त्यावर आणि वरोर डहाणूखाडी रस्त्यावर प्रचंड पाणी आल्याने संपूर्ण वाहतूक बंद झाली तसेच वरोर वाढवण च्या दोन्ही रस्त्यावर प्रचंड पुर आल्याने बस वाहतूक ही बंद ठेवण्यात आली आहे. भिलाड संजाण रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे रु ळावर भराव खचल्याने मुंबई कडे जाणाºया सर्व रेल्वे गाड्यांच्या फेºया बंद ठेवण्यात आल्या होत्या. तर मुंबईहुन डहाणू पर्यंत येणाºया लोकल गाड्या उशीराने धावत होत्या.१२ गावांचासंपर्क तुटलासलग दुसºया दिवशी ही धुवाधार पडणाºया पावसाने तर कहर केला असून विरारमध्ये तब्बल १२ गावांचा संपर्क तुटला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदा ही येथील भाताने पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्यानं ही बिकट परिस्थिती उद्धभवली आहे. सोमवारी सकाळ पासूनच पावसाने उसंत न घेतल्याने या पुलाखालच्या पाण्याची पातळी वाढली आणि पुलावरून पाणी जाऊ लागले, त्यामुळे येथील पुलावरची दोन्ही बाजूंची वाहतूक पाण्याचा स्तर कमी होईपर्यंत रोखून धरली होती. त्यामुळे येथील गावांचा संपर्क तुटलेला होता.वसई : प्रदीर्घ विश्रांतीनंतर शनिवारी रात्रीपासून धो धारा पडणाºया पावसाने मात्र वसई विरारचे मुख्य रस्ते पाण्याखाली गेला असून या दमदार हजेरीने जरी शेतकरी वर्ग सुखावला असला तरी या मुसळधारांची झळा सर्वसामान्य नागरिक , व्यापारी, विद्यार्थी आणि खास करून चाकरमान्यांना बसली आहे, दरम्यान वसईत नवघर, वसई गाव, एस टी डेपो समतानगर, साईनगर, ओमनगर, वसई फाटा, नवघर आद्योगिक वसाहत, गोखिवरे, सातिवली, वालिव तसेच महामार्ग, नालासोपारा येथील आचोळे, सेंट्रल पार्क, प्रगती रोड नगर, तुळींज नालासोपारा पूर्व पश्चिम भाग तर तिथे विरार पूर्व पश्चिम बोळींज खास करून पूर्व भागातील बहुतांशी गावांचा संपर्क तुटला आहे .तालुक्याला पावसाने झोडपले असून सखल भागात पाणी साचण्यासह रस्ते पाण्याखाली गेल्याने मुख्य रस्त्याशी अनेक गावांचा संपर्क तुटला होता. जोराचा पाऊस व वाºयामुळे जांबूगावात घराची पडझड झाली, तर पारनाक्या जवळच्या वडाचे झाड उन्मळून पडले. तर बोर्डीच्या धुंडियापाड्यातील काही घरात पाणी शिरले मात्र सुदैवाने जीवितहानी झाल्याची घटना घडली नाही.शनिवार, रविवारी झालेल्या पावसापेक्षा सोमवारी झालेला पाऊस अधिक होता. सर्वात अधिक पाऊस चिंचणी (२५४.० मिमी) भागात झाला. कासा (२२४.० मिमी), सायवन (१५४.२ मिमी), डहाणू ू(१२५.५मिमी) आणि मल्याण (११७.९ मिमी) इतकी पावसाची नोंद झाल्याची माहिती महसूल विभागाने दिली. पारनाका येथून डहाणू गावाकडे जाणाºया रस्त्यावर महाराष्ट्र बँकेनजिक वडाचे झाड मध्यरात्रीच्या सुमारास पडले. ते सकाळी हटविण्यात आले. तर बोर्डीलगतच्या जाम्बुगांव ग्रामपंचायती अंतर्गत सवू बादल वरठा यांचे विटांचे घर रविवारच्या रात्री आठच्या सुमारास कोसळून पडले.