शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

केळव्यात कासवांना मिळाले जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 06:46 IST

केळवे येथील खाडीतील मासेमारी करणाऱ्या काही मच्छीमारांनी जाळ्यात अडकलेल्या तीन कासवांची सुखरूप सुटका केली.

पालघर : केळवे येथील खाडीतील मासेमारी करणाऱ्या काही मच्छीमारांनी जाळ्यात अडकलेल्या तीन कासवांची सुखरूप सुटका केली. या कासवांना वनविभाग सफाळे यांच्या मदतीने डहाणूच्या वाईल्ड लाईफ कंझर्व्हेशन अँड अ‍ॅनिमल असोसिएशनच्या ताब्यात दिले.केळवे येथील स्थानिक मच्छीमार भुपेंद्र मेहेर, मनोज तांडेल, अनंत तांडेल हे तिघे खाडीत मांडलेल्या डोल नेट जाळीत जमलेले मासे आणण्यासाठी शुक्र वारी २ च्या दरम्यान गेले होते. होडी वल्हविताना त्यांना पाण्याच्या पृष्ठभागावर वाहत जाणाºया जाळ्यात काहीतरी हालचाल दिसून आली. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता काही टाकाऊ जाळ्यांच्या तुकड्यात तीन कासवे जखमी अवस्थेत होती. त्यांनी वागरा प्रकारच्या जाळ्यांचे सर्व तुकडे एकत्र करीत त्या कासवासह किनाºयावर आणले.मच्छीमारांनी जाळ््यातून त्यांना सोडविण्याचे प्रयत्न केले असता ते जखमी अवस्थेत अडकल्याचे दिसून आले.त्या कासवांची सुटका करून त्यांना विहिरीच्या टाकीत ठेवण्यात आले. त्यांच्या जखमेवर हळद लावून रक्तस्त्राव थांबविण्याचा प्रयत्न स्थानिकांनी सुरू केला. मात्र एका कासवाचा पाय पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत असल्याने सफाळे येथील वनविभागाच्या अधिकारी संखे यांना पाचारण करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश प्रभू तेंडोलकर यांच्या मदतीने डहाणू च्या वाईल्ड लाईफ कंझर्वेशन अँड अ‍ॅनिमल असोसिएशनशी संपर्क साधून त्यांच्या कडे ही जखमी कासवे सुपूर्द करण्यात आली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार