शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

पोलीस ठाण्यातील कामकाजाचे विद्यार्थ्यांना धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 23:03 IST

जिल्हा स्थापनेची ५ वर्षे; ५०० विद्यार्थ्यांनी तालुक्यातील सातही पोलीस ठाण्यांतील प्रक्रियेची घेतली माहिती

वसई : १ ऑगस्ट २०१९ रोजी पालघर जिल्हा स्थापनेला ५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने वसई तालुक्यातील सातही पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांना विविध पोलीस ठाण्यातील प्रशासकीय कामकाजाची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी वसई - विरारमधील एकूण पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी येथील विविध पोलीस ठाण्यांना भेट दिली.विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यातील प्रत्यक्ष आणि दैनंदिन कामकाजाची माहिती व्हावी, यासाठी पालघर पोलीस दलातर्फे विद्यार्थ्यांसाठी तालुक्यातील सातही पोलीस ठाण्यात माहिती सत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पोलीस जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली.यावेळी विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यातील विविध विभाग, वायरलेस यंत्रणा, सीसीटीएनएस यंत्रणा, पोलीस कोठडी, पासपोर्ट व्हेरिफिकेशन आदी विभागात भेट दिली असता संबंधित अधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांना या कामकाजाची माहिती दिली. पोलीस ठाण्यातील विविध शस्त्रांचे प्रदर्शनही यावेळी ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांसोबत मोकळा संवाद साधत त्यांना पोलिसांचे कामकाज सांगण्यात आले. याप्रसंगी त्यांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले. न्यू इंग्लिश स्कूल, आयजीजे, दयानंद स्कूल, होली क्रॉस स्कूल, सोपारा स्कूल, अण्णासाहेब वर्तक स्कूल, डॉ.डी.जे.गाळवणकर, सेंट जॉन्स स्कूल येथील विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यांना भेट दिली.उपस्थित शाळा आणि विद्यार्थीयामध्ये वसई पोलीस ठाण्यात - वसई - १००, माणिकपूर - ४५, वालीव - ६७, तुळींज - ३०, नालासोपारा - ५०, विरार - १०० आणि अर्नाळा - ५५ अशा सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यातील कामकाज पाहिले.पालघर जिल्ह्याला १ आॅगस्ट रोजी ५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या संकल्पनेतून वसई अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सातही पोलीस ठाण्यात अतिशय उत्साहात पार पडला.

टॅग्स :Policeपोलिस