शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
5
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
6
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
7
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
8
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
9
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
10
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
11
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
12
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
13
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
14
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
15
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
16
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
17
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
20
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल

विरार पश्चिमेच्या भाजी मंडईकडे विक्रेत्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 23:04 IST

अधिकृत जागा असतांनाही होते अतिक्रमण

विरार : विरार पश्चिमेला असणाऱ्या विराटनगर येथील भाजी मंडईचीअवस्था दयनीय झाली असून विक्रेते येथे बसत नसल्याने ग्राहक देखील येथे फिरकत नाही. मार्केट सोडून भाजी विक्रेते फुटपाथ वर भाजी विकायला बसतात त्यामुळे वाहतूक कोंडी होते. याच कारणामुळे रस्त्यावर अस्वच्छता होते.स्व. भास्कर ठाकूर हीे भाजी मंडई गेल्या दोन वर्षांपासून असून नसल्यासारखे आहे. रस्त्यावर बसणाºया फेरीवाल्यांमुळे वाहतुक कोंडीचे प्रमाण देखील वाढत असल्यामुळे महापालिकेने भाजीवाल्यांना भाजी मंडई उपलब्ध करून दिले होती. तरीदेखील वाहतूक कोंडीचा प्रश्न अजून पूर्णपणे सुटलेला नाही आहे. विरार पश्चिमेला विराट नगरमध्ये असलेले ही मंडई सर्वात जुने आहे.सध्या येथे फक्त दोनच भाजीवाले असून ते आपल्या जागेचा भाडा भरतात. व्यवसाय होत नसल्याने हा भाडा त्याना भुर्दंड ठरत आहे. बाहर बसल्यास दोन हजाराचे दंड बसत आहे. या मंडईमध्ये कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. या मंडईची अर्धी जागा आता पालिकेने बेघरांसाठी वस्ती बनवण्याकरिता वापरली असून उरलेल्या जागेत भंगार ठेवले आहे. त्यामुळे महापालिकेने ही मंडई भाजी वाल्यांसाठी उभारली की बेघरांना राहण्याचे ठिकाण म्हणून हा प्रश्न निर्माण झाला आहे.बाजारात येऊन बसा, असे आम्ही अनेकदा भाजीवाल्यांना सांगितले. जाहिराती देखील काढल्या मात्र, ते यायला बघत नाही. २५ भाजीवाले आले तरी आम्ही ते पुन्हा व्यवस्थित सुरु करू, त्याची दुरुस्ती करू. मात्र ते येत नाहीत. कारण त्या मार्केट मध्ये ग्राहक वळत नाहीत. लोकांना सवय झालेली आहे, चालताचालता रस्त्यात पटकन भाजी घ्यायची त्यामुळे मुद्दाम कोणी आत यायला धजत नाही. म्हणून ही समस्या वाढलेली आहे.- किशोर गावस (उपायुक्त)

टॅग्स :Vasai Virarवसई विरारEnchroachmentअतिक्रमणMarketबाजार