शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

अर्नाळा समुद्रकिनाऱ्याकडे जीवरक्षक पथकाची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:12 IST

पर्यटकांची वाढती संख्या पाहता गांभीर्य वाढले

विरार : येथील अर्नाळा समुद्र किनारी अनेक पर्यटक येत असतात त्यामुळे याठिकाणी जीवरक्षकांसाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. मात्र, तेथे जीवरक्षक नसल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या समुद्र किनारी सर्वात जास्त पर्यटक असल्याने त्यांच्या सुरक्षतेची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. मात्र, जीव रक्षक उपलब्ध नसल्याने पर्यटकांच्या सुरक्षततेची जबाबदारी कोणाची? असा सवाल उपस्थित होत आहे.अर्नाळा समुद्र किनाºयावरील पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना त्यांच्या सुरक्षेची जवाबदारी पोलिसांची व जीवरक्षकांची असते. जीवरक्षकांना पूर्ण समुद्र किनाºयावर व लांब पर्यंत नजर ठेवता येईल यासाठी स्टँड देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, बºयाच वेळा या स्टँडवर जीवरक्षकच नसतात. आपत्कालिन परिस्थितीत त्याला कोण जबाबदार असेल? समुद्रमध्ये रोज भरती व ओहटी असते. अशावेळी जीवरक्षकांचे त्यांच्या जागेवर असणे गरजेचे आहे. पर्यटक बाहेरून येत असल्याने त्यांना समुद्राच्या पाण्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे ते मजा करण्यासाठी पाण्यात खोल पर्यंत जातात. एखादी लाट जोरात आली तर एखादा व्यक्ती जीव गमवू शकतो.बुडणाºयांना वाचवण्याकारिता हे जीवरक्षक नेमलेले आहेत. पण याठिकाणी गर्दीच्या वेळेस देखील कोणीही उपलब्ध नसतं. रविवार हा सर्वात जास्त गर्दीचा दिवस असतो त्यावेळी देखील जीवरक्षक याठिकाणी उपलब्ध नसल्याने त्यांना दिलेला स्टँड हा रिकामी असतो किंवा त्याठिकाणी इतर तरुण टवाळ्या करत बसलेले असतात. परिणामी समुद्रात एखादी घटना घडली तरी त्याकडे कोणाचं लक्ष नसते. नावापुर, भुईगाव याठिकाणी अजून जीवरक्षक नेमलेले नाही. पण ज्याठिकाणी नेमले आहेत त्या ठिकाणी कुणीही दिसत नाही.जीवरक्षक नेमलेले आहेत त्यांच्या स्टँड वर ते ड्युटी प्रमाणे असतात. समुद्र किनारी बळी जाण्याचा आणि जीवरक्षकाचा काही संबंध नाही अपघाताची दुसरी कारणे देखील असू शकतात त्यामुळे जीवरक्षकांना चुकीचे ठरवणे योग्य नाही.- विजयकांत सागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक

टॅग्स :Vasai Virarवसई विरार