शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरच्या जमान्यात शेतकऱ्यांची नांगराकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 02:53 IST

पावसाळा आला म्हणजे ग्रामिण भागात डोळ्यासमोर उभी राहते हिरवीगार शेती. शेतात पेरणी, चिखलणीसाठी चालणारे नांगर आणि त्यांना हाकणाºयांचा घुमणारा आवाज. सोबतच नांगर ओढणारी बैलांची जोडी.

कासा - पावसाळा आला म्हणजे ग्रामिण भागात डोळ्यासमोर उभी राहते हिरवीगार शेती. शेतात पेरणी, चिखलणीसाठी चालणारे नांगर आणि त्यांना हाकणाºयांचा घुमणारा आवाज. सोबतच नांगर ओढणारी बैलांची जोडी. मात्र, आजच्या आधुनिक काळात ही बैलांची नागरणीही थांबली असून त्याऐवजी शेतकरी ‘पॉवर टिलर’ वापराकडे वळतात दिसत आहेत.पूर्वी शेतकरी म्हटला म्हणजे त्यांच्याकडे असणारी डौलदार बैलांची जोडी, लाकडी नांगराच्या एक दोन जोड्या आणि बैलगाडी असे चित्र असे. एकदा जून महिना उजाडला की, शेतकरी जमीन मशागतीसाठी नांगर दुरुस्ती करणे, नवीन नांगर तयारकरणे, एखादा बैल कमी असल्यास बैल शोधणे, नवीन बैल खरेदी करणे किंवा भाड्याने बैल आणणे, नांगरणी व चिखलणीसाठी लागणाºया फळीसाठी मजबूत लाकूड शोधणे अशा कामांची शेतकºयांची लगबग सुरू होत असे.ग्रामिण भागातील शेतकरी आता मशागतीच्या कामासाठी पॉवर टिलर वापरु लागला आहे. लाकडी नांगराऐवजी पॉवर टिलरचा वापर केल्याने शेतकºयांचा वेळ, पैसा तसेच शारिरीक श्रमही वाचतात. साधारणपणे पॉवर टिलर दोन तासात एक हेक्टर जमीन नांगरतो. त्यामुळे नांगराच्या तुलनेत कमीत कमी वेळात जास्त जमीन नांगरली जात असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.पूर्वीच्या काळी शेतकरी लावणी, नांगरणी, पेरणी आदी कामे एकमेकांच्या शेतात जाऊन मदत करत असत. परंतु आता मजुरांची टंचाई व पावसाचा अनियमतिपणा त्यामुळे प्रत्येक शेतकरी आपल्या परीने आपली शेतीची कामे पेरणी, रोपणी लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करतात. पॉवर टिलर भाड्याने घेणाºया शेतकºयांना ३०० रु प्रति तास या भावाने पैसे मोजावे लागतात. त्यामुळे बरेच शेतकरी शेतीच्या कामासाठी लाकडी नांगराऐवजी लवकरात लवकर काम पूर्ण करण्यासाठी पॉवर टिलर वापरत आहेत. या आधुनिकिते मुळे शेतकरी फायद्यामध्ये असून त्याचे श्रमही वाचत आहेत.आधुनिकता परवडणारीसध्या बाजारात एका बैलजोडीची किंमत ३० ते ४० हजारावर पोहचली आहे. त्यातच वर्षभर बैलांची राखण करणे, त्यांना खाद्य पुरविणे आदी न परवडणाºया बाबी शेतकºयांना कराव्या लागतात. मात्र, पॉवर टिलर व ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकºयांना व महिला बचत गटांना ३५ ते ५० टक्के अनुदान शासनाकडून मिळते त्यामुळे ते पॉवर टिलर कडे वळताना दिसत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती