शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई असतांनाही अनेक जागी गळती

By admin | Updated: May 3, 2016 00:33 IST

संपूर्ण महाराष्ट्रसह पालघर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील दुर्गम भाग आजही पाणीटंचार्इंनी व्याकुळ झाला असताना वाढीव पालघर व इतर २६ गावे प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनचे

पालघर : संपूर्ण महाराष्ट्रसह पालघर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील दुर्गम भाग आजही पाणीटंचार्इंनी व्याकुळ झाला असताना वाढीव पालघर व इतर २६ गावे प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनचे व्हॉल्व्ह बारा महिने गळत असून सातपाटी, शिरगाव रत्यावरील पाइपलाइन फुटून दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. ही पाण्याची सुरू असलेली नासाडी रोखण्याचे काम संबंधित विभाग, कार्यालये करीत नसल्याचे दिसून येत आहे.वाढीव पालघर व इतर २६ गावे प्रादेशिक ग्रामीण नळपाणी पुरवठा योजनेच्या २० आॅक्टोबर २०११ रोजी २० कोटी ८१ लाख ८२ हजार इतक्या किमतीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर भूसंपादन इतर बदलामुळे व पालघर शहराचे नगरपालिकेत रुपांतर झाल्यामुळे योजनेच्या खर्चात वाढ झाली. सातपाटी, खारेकरण, मोरेकरण, उमरोळी, हरवाडी, शिरगाव, धनसार इत्यादी उंच गावाला पाणीपुरवठा व त्या अनुषंगाने कामाची व्याप्ती वाढली व खर्चात वाढ करण्यात येऊन ही योजना चार वर्षांपूर्वीपासून कार्यान्वित झाली.मान्यता दिल्यानंतर जॅकवेलची उर्वरीत कामे पूर्ण करणे, गुरुत्ववाहिनी उर्ध्ववाहिनी, टाकी, जलशुद्धीकरण केंद्र, १९ जलकुंभ व वितरण व्यवस्था अशुद्ध पाण्याची पंपिंग मशिनरी, पीव्हीसी पाइप ऐवजी जी आय पाइप बदलणे इ कामे पूर्ण करण्यात आली. परंतु मागील चार वर्षांपासून देवखोपचे जलशुद्धीकरण केंद्र, देवखोप टेंभोडे पेट्रोलपंप, धनसार, शिरगाव, सातपाटी इ. भागतील व्हॉल्व्ह आजही गळतच आहेत. तर शिरगाव चुनाभट्टी, सर्वोदय संस्थेचे वळण, श्रराम मंदिर स्टॉप, हुतात्मा स्मारक या भागातील पाइपलाईन वर्ष भरात अनेक वेळा फुटून लाखो लिटरची पाण्याची नासाडी होत आहे. दुरुस्त्याच्या नावाखाली लाखो रुपयांचा खर्च दाखविला जात असताना पाण्याच्या गळत्या मात्र थांबलेल्या दिसून येत नाही. सातपाटीच्या हुतात्मा स्मारकांजवळ काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणात जमिनीखालची पाइपलाईन फुटून शेकडो लिटर्स पाणी वाया जात असून त्यावर उपाययोजना केली जात नसल्याने केली जात नसल्याने पाणी वाया जाण्याचे प्रमाण सुरूच आहे. जव्हार, विक्रमगड, मोखाडा भागतील जनता एक एक थेंब पाण्यासाठी मोठी पायपीट करीत असताना मात्र पाण्याची गळती रोखण्याची तयारी प्रशासन घेत नसल्याने पालघारलाही पाण्याच्या मोठ्या कपातीचा सामना करावा लागू शकतो. (प्रतिनिधी)