शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

हुक्का पार्लर्सविरोधात आघाडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 23:54 IST

कर्मचाऱ्यावर विषप्रयोगाची घटना : सामाजिक संघटनांकडून कारवाईची मागणी

आशीष राणे ।लोकमत न्यूज नेटवर्कवसई : वसईतील शहरी भागात सुरू असलेल्या एका हुक्का पार्लरवर मागील आठवड्यात वसई पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली होती. या हुक्का पार्लरची ‘टीप’ दिल्याच्या संशयावरून एका कर्मचाºयावर विषप्रयोग केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर आता वसईतील हुक्का पार्लर्सविरोधात सामाजिक संघटनांनीही आघाडी उघडली असून चोहोबाजूंनी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.राज्यात सर्वत्र हुक्का पार्लरवर बंदी असतानाही वसई-विरार शहरातील महामार्ग असो वा शहरी भागातील हॉटेल, मॉल, उपाहारगृहे आणि विविध ठिकाणी हुक्का पार्लर सुरू आहेत. पालघर पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करीत या हुक्का पार्लर्सवर कडक व कायमस्वरूपी बंदीची मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे, अशी माहिती समीर वर्तक यांनी दिली. दरम्यान, वसई-विरार परिसरातील नवघर-माणिकपूर शहर, पापडी, वसई गाव आणि खासकरून महामार्गावरील हॉटेल आणि उपाहारगृहांमध्ये बेधडक हुक्का पार्लर आजही सुरू आहेत. याशिवाय कित्येक ठिकाणी अनधिकृतपणे हुक्का पार्लर केंद्रे उघडण्यात आली असून त्याकडे अल्पवयीन मुले आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने आकर्षित होत आहेत.वसईतील अनेक हुक्का पार्लरमध्ये अंमली पदार्थाची छुप्या पद्धतीने विक्र ी होत असून यामुळे वसईची तरुण पिढी नशेच्या आहारी जात असल्याचे नागरिक सांगत आहेत. हुक्का पार्लरवर बंदीचा कायदा असला तरी कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी होत नसल्यामुळे हुक्का पार्लर चालकांचे फावले आहे, अशी खंतही महिलांकडून व्यक्त करण्यात येत आहे.वसईतील काही मॉलमध्ये दररोज शेकडो नागरिक खरेदी आणि करमणुकीकरिता येतात. यामध्ये महाविद्यालयीन तरुणांची संख्या मोठी असते. या मॉलमध्ये बेकायदा हुक्का पार्लर चालवले जात असून त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी नशेच्या आहारी जात आहेत तर काही हॉटेलमध्येही हा व्यवसाय जोरदारपणे चालवला जात आहे.परिणामी वसईतील या हुक्का समस्येबाबत आमच्याकडे तक्रारी येत आहेत. जिल्हाधिकारी तथा पोलीस अधीक्षकांना याबाबत कळवले आहे. हुक्का पार्लर चालवणाºयांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, असे पर्यावरण संवर्धन समितीचे समीर वर्तक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.अनेक ठिकाणी हुक्कापार्लर चालकांची दादागिरी वाढू लागली असून त्यामुळे गुन्हेगारीच्या घटना वाढून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याच्या मुद्याकडे ‘हरित नैसर्गिक वैभव बचाव’चे मॅकेन्झी डाबरे यांनी वेधले. आतापर्यंत रेल्वे स्थानकालगतच्या परिसरापर्यंत मर्यादित असलेली बेकायदा हुक्का केंद्रे वसईच्या हरित पट्ट्यातही शिरकाव करू लागली आहेत.पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार ज्या ठिकाणी अनधिकृत हुक्का पार्लर सुरू आहेत, त्या सर्वांवर कारवाई करण्याचे सक्त निर्देश सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत. तरी केवळ पोलीसच नव्हे तर सर्वसामान्यांनीही एक जबाबदार नागरिक म्हणून हुक्का पार्लरची माहिती पोलिसांना द्यावी. - विजयकांत सागर, अप्पर पोलीस अधीक्षक, वसई