शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

कोरोनाच्या लाटेत घरातील कर्ते पुरुष गमावल्याने हसती-खेळती कुटुंबे उद्ध्वस्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 23:51 IST

अनेक घरांतील परिस्थिती चिंताजनक  : परिसरात व्यक्त होतेय हळहळ 

लोकमत न्यूज नेटवर्क पारोळ : वसई तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून, वसई, नालासोपारा, विरार या शहरी भागांत दररोज ८००च्या घरात रुग्णसंख्या आढळत आहे. शहराबरोबर ग्रामीण भागातील गावा-गावातही कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असतानाच, आता रुग्णांचे मृत्यूही होत असल्याने कोरोना चिंतेचा विषय बनला आहे. या कोरोना लाटेच्या प्रभावामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून, घरातील कर्ते पुरुष गेल्याने अनेक कुटुंबांतील आधार हरपला आहे. वसई ग्रामीण भागातील भालीवली गावातील हसत्या-खेळत्या पाटील कुटुंबातील तीन व्यक्तींना कोरोनाने हिरावून घेतल्याने आज हे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.कोरोनाचा कहर वसईच्या ग्रामीण भागात वाढतच असून, सुरू असलेल्या दुसऱ्या लाटेत भालीवलीस्थित एकाच कुटुंबातील वडील, आई व मुलगा अशा तिघांचा सहा दिवसांत अंत झाल्याने परिसरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. भालीवली गावातील पाटील कुटुंबातील रामचंद्र जगन्नाथ पाटील (वय ७२) यांचा १४ एप्रिल रोजी उपचार सुरू असताना अंत झाला. लगेचच दुसऱ्यादिवशी त्यांची पत्नी रेखा पाटील (६८) यांचाही मृत्यू झाला. या दुहेरी दुःखाचा डोंगर कोसळलेल्या पाटील कुटुंबातील त्यांचा मुलगा गणेश रामचंद्र पाटील (३५) याचेही सहाव्यादिवशी उपचारादरम्यान निधन झाले. यामुळे संपूर्ण पाटील कुटुंबावर दुःखाचा सागर कोसळला असल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.वसई ग्रामीण भागातसुद्धा कोरोना रुग्णांत मृत्यूचे प्रमाण वाढले असून, कोपर, हेदवडे, भालीवली, नवसई, भाताणे, आंबोडे, शिरवली, पारोळ, देपिवली, शिवणसई, तिल्हेर, चांदीप, भामटपाडा या गावांतील नागरिकांनी आपले जीव गमावले आहेत. या भागात नागरिकांमध्ये भीती पसरली असून, आता जनजागृतीची गरज आहे.बेड मिळविण्यासाठी नातेवाइकांची कसरततालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा रोज वाढत चालल्याने आरोग्य यंत्रणा अपुरी पडू लागली आहे. सर्व सरकारी व खासगी रुग्णालयांत रुग्णांना बेड मिळविण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागते. त्यात ऑक्सिजनही अपुरा पडत आहे. आयसीयू व व्हेंटिलेटर बेडसाठीही वाट पाहावी लागत असल्याने अनेकांचा मृत्यू होत असल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या