शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

‘लेटलतीफ’ शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2021 10:41 IST

School : जिल्हा परिषद शाळांमधील ८० टक्के शिक्षक तालुक्याला निवासी न राहता नाशिक, त्र्यंबकेश्वर येथून ये-जा करतात. यामुळे लेटलतिफ कारभाराचा गाडा नेहमीचाच झाल्याची ओरड पालक वर्गातून केली जात आहे.

खोडाळा : ग्रामीण भागातील प्रत्येक गावपाड्यांमधील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे यासाठी शासन स्तरावर सर्वच मार्गाने प्रयत्न केले जात आहेत. यासाठी शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत, मोफत शिक्षण, मोफत गणवेश, वह्या-पुस्तके, पोषण आहार इत्यादी उपक्रम राबविले जातात; मात्र मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जेथे वेगवेगळे उपक्रम राबविले जातात, तेथे प्राथमिक शिक्षकांच्या लेटलतिफ कामामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे. 

बिवलपाडा, दापटी, धामोडी, करोळी, आसे, ब्राह्मणपाडा, कुडवा, धामणी आदी परिसर मोखाडा तालुक्यापासून २० कि.मी. अंतरावर असल्याने या परिसरातील जिल्हा परिषद शाळा सुरू होण्याच्या वेळेच्या १५ ते २० मिनिटे उशिरा येत असून पंधरा मिनिटे लवकर सुट्टी दिली जात असल्याचा आरोप होत आहे. तालुकाभरात जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या १५८ प्राथमिक शाळा असून मोखाडा शहर व खोडाळा बाजारपेठ जवळपासच्या शाळा शालेय वेळेत सुरू होऊन शाळेच्या वेळेत सुट्टी होते, परंतु तालुक्यापासून १५ ते २० किलोमीटर अंतरावरील शाळा पंधरा मिनिटे उशिरा तर सुट्टी पंधरा मिनिटे लवकर होते.

त्यात भर म्हणून आठवड्यातून दोन ते तीन वेळा तालुक्याला मिटिंगा किंवा शालेय माहिती देण्यासाठी यावे लागत असल्याचा ससेमिरा नेहमी शिक्षकांकडून पुढे केला जातो. त्यामुळे शासनाकडून गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या शिक्षकांनी राज्याचे अथवा देशाचे भवितव्य शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याऐवजी आपली कामाची उपस्थिती भरण्यासाठी तर खटाटोप नाही ना, असा सवाल उपस्थित होत आहे. जिल्हा परिषद शाळांमधील ८० टक्के शिक्षक तालुक्याला निवासी न राहता नाशिक, त्र्यंबकेश्वर येथून ये-जा करतात. यामुळे लेटलतिफ कारभाराचा गाडा नेहमीचाच झाल्याची ओरड पालक वर्गातून केली जात आहे.

पाठीशी घालण्याचा प्रयत्न तर नाही ना?पालघर जिल्ह्यात मुळात जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या शाळा साडेदहा वाजता सुरू होतात. पाच वाजता शाळांना सुट्टी होत असते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वेळेतील अर्धा तास वाया जात असल्याने जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य शिक्षकांच्या लेटलतिफ कामामुळे धोक्यात आले आहे. असे असतानाही पंचायत समितीचा शिक्षण विभाग या शिक्षकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न तर करत नाही ना, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :palgharपालघर