शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कुर्झे धरणाची सुरक्षा वाऱ्यावरच; भूकंपाचाही धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 22:32 IST

वीज नाहीच, वीजपुरवठ्याअभावी सुरक्षा धोक्यात; कर्मचारी तैनात

तलासरी : तलासरी, डहाणू भागात पडलेला परतीचा पाऊस आणि सातत्याने बसणारे भूकंपाचे धक्के अशा वेळी आपत्तकालीन परिस्थिती उद्भवल्यास कुर्झे धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पण हे धरणाचे दरवाजे उघडण्यास आवश्यक वीज पुरवठाच धरणावर नाही, याचे सोयरसुतक अधिकाऱ्यांना नाही.कुर्झे धरणावर नऊ महिन्यापासून वीज नाही, याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मधून प्रसिद्ध करताच, धरणावर वीजपुरवठा करण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वीज विभागाने केला. पण चाळीस वर्षांपूर्वीच्या जीर्ण तारा तसेच डबघाईला आलेले ट्रान्सफॉर्मर यामुळे वीज पुरवठा सुरू करण्यास अडचणी येत असल्याचे वीज विभागाचे उपअभियंता प्रशांत दोडे यांनी सांगितले.दापचरी दुग्ध प्रकल्पाची वीज व्यवस्था सार्वजनिक बांधकाम खात्याचे वीज विभाग बघते. त्याचा कारभार कल्याणवरून चालतो. या दुग्ध प्रकल्पात असलेल्या वीज तारा, ट्रान्सफार्मर हे चाळीस वर्षांपूर्वीचे आहेत. ते दुरुस्त करण्यासाठी तसेच बदलण्यासाठी निधीची गरज आहे. पण हा निधी दुग्ध आयुक्तांकडून दिलाच जात नसल्याने प्रकल्पात अनेक वीज समस्या आहेत. प्रकल्पाची वीज पुरवठा वीज वितरण कंपनीकडे हस्तांतर करण्याचा प्रस्ताव पाच वर्षांपासून दुग्ध विकास आयुक्तांकडे प्रलंबित आहे. वीज पुरवठा हस्तांतर करण्याचा प्रस्ताव असल्याने प्रकल्पाला वीज दुरु स्तीसाठी निधीही दिला जात नाही. ना निधी ना हस्तांतर यामुळे वीज पुरवठ्याअभावी धरणाची सुरक्षाच धोक्यात आली आहे.वीज पुरवठा होत नसल्याने आपत्कालीन स्थितीत धरणाचे दरवाजे उघडण्यास बांधकाम विभागाने धरणावर कर्मचारी नेमल्याचे प्रकल्प बांधकाम विभागाचे ज्युनियर इंजिनिअर कुंदन वाघ यांनी सांगितले. पण आपत्तकालीन परिस्थितीत दरवाजे कर्मचाºयांकडून तत्काळ उघडतील का याबाबत त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही. तर, दापचरी दुग्ध प्रकल्पाचे सहा. प्रकल्प अधिकारी एस.सी. चौधरी यांनी फोनच उचलला नाही.

टॅग्स :Damधरण