शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

कुणबी-आदिवासी हे जिल्ह्याची दोन चाके

By admin | Updated: May 13, 2017 00:36 IST

कुणबी व आदिवासी हे पूर्वीपासून जिल्ह्यात गुण्यागोविंदाने राहत असून हे दोन्ही समाज म्हणजे जिल्ह्याच्या रथाची दोन चाके आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क वाडा : कुणबी व आदिवासी हे पूर्वीपासून जिल्ह्यात गुण्यागोविंदाने राहत असून हे दोन्ही समाज म्हणजे जिल्ह्याच्या रथाची दोन चाके आहेत. या दोन्ही समाजाने हातात हात घालून बरोबरीने काम केल्यास जिल्ह्याचा विकास अधिक गतीमान होईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री व पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी वाडा येथे बोलतांना केले. ते वाड्यातील गांधरे येथील कुणबी समाजगृह येथे बोलत होते. समाजातील गुणवंत हीच समाजाची खरी संपत्ती असून या गुणवंताची कदर केली पाहीजे व समाजातील या गुणवंताचा आदर्श इतरांनी नक्की घ्यावा, असं आवाहनही यावेळी सवरा यांनी केले. वाडा तालुक्यातील सरस ओहोळ गावचे किशोर देवराम ठाकरे यांना ठाणे वनविभागात सामाजिक वनीकरणचे वनसंरक्षक म्हणून पदोन्नती मिळाली आहे. यानिमित्ताने कुणबी समाज मंडळ वाडा-विक्र मगड यांच्यावतीने गांधरे येथील कुणबी समाजगृहाच्या प्रागंणात भव्य कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजातील विविध क्षेत्रात विशेष कामिगरी करणार्या गुणवंताचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यात निलेश सांबरे (सामाजिक क्षेत्र), चिन्मय पाटील (आयएसीएस) अर्थ मंत्रालय भारत सरकार, यतिश पाटील (आयआरएस), कौस्तुभ ठाकरे (सेंट्रल एआरएम फोर्स), पराग दुपारे (अनुशास्त्रज्ञ), प्रदीप पाटील (सब डीएफओ), प्राजक्ता पाटील (सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर), प्रशांत दुपारे (आर्किटेक्ट), गायत्री पाटील, स्नेहा पाटील (सी.ए.), शिल्पा पाटील, तृप्ती म्हस्कर, योगेश पाटील, योगिनी पाटील (पीएचडी), यतीन पाटील (पीएसआय) तर प्रज्ञा शोध परीक्षेत सलग दुसर्यांदा राज्यात प्रथम आलेल्या मानसी पाटील यांचाही मान्यवरांचे हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी खासदार चिंतामण वनगा यांनी वनौषधींची लागवड हा शेतकऱ्यांसाठी पुरक व्यवसाय होऊ शकतो व त्यासाठी किशोर ठाकरेंसारखे चांगले अधिकारी शेतकऱ्यांना नेहमीच मदत करतील, अशी आशा व्यक्त केली. तर आमदार पांडुरंग बरोरा यांनी अत्यंत खुमासदार शैलीत वाड्याची माती कशी दमदार आहे, हे उदाहरणासह सांगितले. तसेच कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी शेतकऱ्यांना सतावणाऱ्या व जाचक ठरलेल्या वन संज्ञा, ३५ सेक्शन व इको सेंसिटिव्ह झोन उठविण्याबाबत समाजातील अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्र माचे प्रास्ताविक सत्कार समितीचे अध्यक्ष हरिभाऊ पाटील यांनी केले. यावेळी बोलतांना त्यांनी गांधरे येथील कुणबी समाज मंडळाच्या जागेत समाजगृहाची भव्य इमारत उभारण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यासाठी चार कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असून त्यासाठी सर्वांनी सढ्ळ हस्ते मदत करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. त्यांच्या या. आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळाला व अंदाजे दोन कोटीचा निधी या कार्यक्र माच्या दरम्यान विविध दात्यांनी जाहीर केला.कार्यक्र माचे आभारप्रदर्शन समितीचे खजिनदार विलास आकरे यांनी केले. कार्यक्र माचे सूत्रसंचालन बी.के. पाटील व वैष्णवी गव्हाळे यांनी केले. याचवेळी महिलांसाठी हळदीकुंकु कार्यक्र माचे आयोजनही करण्यात आले होते. यासाठी महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती.