शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पतंगबाजी बेतली जीवावर; पाचवर्षीय मुलाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 22:37 IST

तंग उडवीत असताना झालेल्या बाचाबाचीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या शेजाºयाला उचलून आपटून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपी रवींद्र नाईक (२९, रा.खाणपाडा) याला पोलिसांनी अटक केली आहे.

नालासोपारा : पूर्वेकडील परिसरात राहणाऱ्या एका पाच वर्षांच्या चिमुकल्या मुलाचा पतंग पकडण्यासाठी गेला असताना बाजूलाच एका निर्माणाधीन इमारतीच्या उघड्या पाण्याच्या टाकीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. तुळींज पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री त्याचा मृतदेह सापडल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

नालासोपारा पूर्वेकडील आचोळे डोंगरी येथील एकता कॉलनीमधील सदनिका नं.२ मध्ये चंडालिया कुटुंब राहते. त्यांचा एकुलता एक पाच वर्षांचा मुलगा वंश विकास चंडालिया हा बुधवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर खेळत असताना मकरसंक्रांत सण असल्याने पतंग पकडण्यासाठी गेला होता. पण तो घरी परतलाच नाही. घरच्यांनी व नातेवाईकांनी आजूबाजूला शोध घेतला असता तो मिळून न आल्याने तुळींज पोलीस ठाण्यात जाऊन अपहरणाची तक्रार देत गुन्हा दाखल केला होता. मात्र एकता कॉलनीच्या जवळच एका निर्माणधीन इमारतीच्या पाण्याच्या उघड्या टाकीत मुलाची एक चप्पल दिसल्यावर टाकीत शोध घेण्यात आला. अखेर रात्री उशिरा त्याचा मृतदेह सापडला. बांधकाम व्यावसायिकाने पाण्याच्या टाकीवर झाकण ठेवले असते किंवा सुरक्षारक्षक ठेवला असता तर या पाच वर्षांच्या चिमुकल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला नसता, अशी चर्चा परिसरात सुरू होती. या घटनेनंतर चंडालिया कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

शेजाºयाला आपटून ठार करण्याचा प्रयत्नपालघर : पतंग उडवीत असताना झालेल्या बाचाबाचीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या शेजाºयाला उचलून आपटून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपी रवींद्र नाईक (२९, रा.खाणपाडा) याला पोलिसांनी अटक केली आहे. सदर आरोपीवर सातपाटी सागरी पोलीस स्थानकात एका उद्योगपतीची लूट केल्या प्रकरणीही गुन्हा नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस सूत्रांनुसार बुधवारी मकरसंक्रांतीच्या दिवशी दुपारी पालघरमधील खाणपाडा येथे या प्रकरणातील मारहाणीत अत्यवस्थ असलेला नरेश वेडगा (२५) हा आपल्या काही नातेवाईक, मित्रमंडळींसोबत पतंग उडवीत असताना आरोपी आपल्या मोटारसायकलीवर बसून तेथून जात होता. या वेळी मोटरसायकलीमध्ये मांजा अडकल्या प्रकरणावरून दोघात बाचाबाची झाली.

आरोपीने नरेश याला या वेळी उचलून काँक्रीटच्या रस्त्यावर आपटले. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला प्रथम पालघर ग्रामीण रुग्णालयात, नंतर सिल्वासामधील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डोक्यात रक्तस्त्राव झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी सुरत येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे, असे सपोनि. संदीप कहाळे यांनी सांगितले.

टॅग्स :kiteपतंग