शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण केलेल्या मुलाची आठ तासात सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 00:37 IST

नालासोपारा पूर्व येथून बुधवारी मध्यरात्री दहा वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला अवघ्या आठ तासात तुळींज पोलिसांनी अटक केली आहे.

वसई : नालासोपारा पूर्व येथून बुधवारी मध्यरात्री दहा वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला अवघ्या आठ तासात तुळींज पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या तावडीतून मुलाची सुखरुप सुटका करून त्याला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.नालासोपारा पूर्व विजयनगर येथील जय अंबे कॉलनीत नंदलाल यादव आपली पत्नी निला व तीन मुलांसोबत राहतो. नंदलाल याचा चाळ बांधण्याचा व्यवसाय आहे. काही महिन्यांपूर्वी नायगांव येथे बांधलेल्या चाळीतील रूम त्याने गोरगांव येथील बबलू ठाकुर या व्यक्तीला विकली होती. मात्र, वारंवार सांगूनही नंदलाल रूमचा ताबा बबलूला देत नव्हता. तसेच, रूम नाही तर पैसे परत कर असा तगादा लावूनही नंदलाल घेतलेले पैसे देत नव्हता. त्यामुळे चिडलेल्या बबलू ठाकूर बुधवारी मध्यरात्री २ वाजता आपली आई व इतर दोन साथीदारां समवेत त्याच्या घरी गेला. मात्र त्यावेळी तो घरी नव्हता. तेव्हा त्याने त्याचा मुलगा हिमांशू (१०) याला ताब्यात घेत नंदलालची पत्नी निला यादव हीला धमकी देत सांगितले की, मूलगा हवा असेल तर पैसे परत करा. तसेच पोलिसांना याबाबत कळवले तर मुलगा जिवंत राहणार नाही. त्यानंतर ते त्यास घेऊन निघून गेले.याबाबत निला यादव यांनी तुळींज पोलिस ठाण्यात धाव घेत तक्र ार दाखल केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॅनियल बेन यांनी त्वरित एक विशेष पथक अपहरणकर्त्यांच्या मागावर पाठविले. त्यांच्या मोबाईल लोकेशनवरून गोरेगांव येथून बबलू यादव व त्याच्या साथीदारांना अटक करून मुलाची सुखरुप सुटका करण्यात आली. ही कारवाई अवघ्या आठ तासात केल्याने पोलिसांचे कौतूक होत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता तोटेवाड यांनी मूलाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले असून बबलू यादव सह इतर आरोपींवर गुन्हे केल्याचे सांगितले.