शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

खानिवडे गावच्या खाडीमध्ये सापडला तब्बल 22 किलो वजनाचा "खाजरी" मासा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 21:25 IST

चक्क 22 किलो वजनाचा "खाजरी" नावाचा भला मोठा मासा गळाला लागल्याने त्यांचे नशीब या लॉकडाऊनच्या टाळेबंदीत देखील चमकले आहे.

आशिष राणेवसई :  सर्वत्र कोरोनाचे संकट व त्यात लॉकडाऊन सुरु असल्याने मागील दीड महिन्यापासून कुणालाही काहीही कामकाज नाही त्यात आपला व कुटुंबाचा घरखर्च कसा चालवायचा या विचाराने या मच्छीमार तरुणाने आपल्या वसई पूर्वेच्या ग्रामीण भागातील पारंपरिक व्यवसायाला पुन्हा एकदा हात घालीत खानिवडे खाडीत मासेमारी करून "खाजरी" नावाच्या चविष्ट भल्या मोठ्या माश्यालाच आपल्या जाळ्यात अडकवले आहे.वसई तालुक्यातील पूर्व भागात मुंबई -अहमदाबाद महामार्गावरील खानिवडे गावाच्या तानसा खाडीत मासेमारी करणाऱ्या विकास किणीना अलीकडेच त्यांनी लावलेल्या जाळ्यात चक्क 22 किलो वजनाचा "खाजरी" नावाचा भला मोठा मासा गळाला लागल्याने त्यांचे नशीब या लॉकडाऊनच्या टाळेबंदीत देखील चमकले आहे.विशेष म्हणजे विकास किणी यांना मिळालेला खाजरी नावाचा हा मासा हा काट्यांचा नसून खायला अत्यंत चविष्ठ असल्याने त्याला खाडीबाहेर काढल्यावर लगेचच मागणी आली आणि याप्रसंगी अनेक खवय्यांनी मिळून तब्बल दहा हजार पाचशे रुपयांनी या माश्याची खरेदी झाली.दरम्यान येथील खाडीतील मासेमारी पकडण्याचे नियोजन अत्यंत उत्तम असल्याचे खानिवडे ग्रामस्थ विश्वनाथ कुडू सांगतात,कि या खाडीत दररोज येणाऱ्या भरती व ओहोटीच्या प्रवाहात गळ टाकून, झोलणे झोलुन, पांग फेकून, वेढी लावून, प्रवाहाच्या धारेत वाघरु ठेवून व अंधारात हाताने चाफून हि नियोजनबद्ध मासेमारी केली जाते.आणि असे हे विशेष मासेमारीचे चित्र महामार्गावरून नेहमीच येता- जाता मुंबई किंवा गुजरातकडे जाणाऱ्या सर्वांच्याच दृष्टिक्षेपात दिसत असते.परंतु सध्या टाळेबंदी असल्याने महामार्गावर शुकशुकाट व त्यासोबत प्रदूषण देखील फारच कमी आहे.

महामार्गावर अगदी तुरळक व अत्यावश्यक वाहनेच धावत आहेत आणि त्यामुळे खाडीचे पाणी देखील स्वच्छ व संथ झाले आहे..अगदी छोट्या -छोट्या माश्यांच्या मासेमारीत अगदी केव्हा तरी आतापर्यंत केवळ 10 किलोच्या आसपास असा एखादा मासा आढळला असल्याचा इतिहास आहे.आणि आता तर लॉकडाऊन मध्येच हा भला मोठा मासा भरतीवर लावलेल्या जाळ्यात ओहोटीच्या वेळी गावला आणि गावच्या मच्छीमार तरुणाचे नशीब या कोरोनच्या संकटात देखील टाळेबंदीत दिलासा देणारे ठरले याला योगायोगच म्हणावं लागेल.

टॅग्स :fishermanमच्छीमार