शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

मुख्यमंत्री ग्रामसडकला पडले खड्डेच खड्डे

By admin | Updated: April 1, 2017 05:18 IST

मासवण ते नागझरी या बोईसरला जोडणाऱ््या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्याला आताच भगदाडे पडायला सुरुवात

हितेन नाईक / पालघरमासवण ते नागझरी या बोईसरला जोडणाऱ््या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्याला आताच भगदाडे पडायला सुरुवात झाली आहेत. त्यामुळे येत्या पावसाळ्यातच तो वाहून जाण्याची चिन्हे असल्याने स्थानिकासोबत सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरेनी त्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.दर्जोन्नतीसाठी मासवण ते नागझरी राज्यमार्ग क्रमांक ३४ असा ० किमी ते ९/८५३ किमी लांंबीचा रस्ता २१ आॅक्टोबर पासून सुरु होणे अपेक्षित असतांना अलीकडेच तो सुरु झाला. ठेकेदार या रस्त्याचे काम निकृष्ट करीत असल्याचे येथील नागरिकानी निदर्शनास आणून दिले आहे. सुमारे ५ कोटी ५ लाख ८५ हजार किमतीच्या या रस्त्यावर ९.७०३ किमी डांबरीकरण होणार आहे तसेच पाणी जाण्यासाठी एकूण १२ मोऱ्या समाविष्ट आहेत. यामध्ये १ किमीचा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम खाते बांधणार असून यातील काँक्र ीटचा काही भाग जिल्हा परिषद बांधणार आहे.या रस्त्यांची उंचीही वाढवण्यात आली असली तरी मोऱ्या अरुंद असल्याने पावसाळ्यात डोंगरावरून येणारे पाणी साचून शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता ज्ञाती हितवर्धक संघाचे माजी अध्यक्ष एम पी पाटील यांनी वर्तविली आहे. पूर्वी मासवणहून नागझरीमार्गे बोईसर व तिथून पुढे जाण्यासाठी येथील वांदिवाली, वाकडी, वसरोली, खरशेत, काटाले, लोवरे, निहे, नागझरी ई. भागातील ५ हजार रहिवाशांसाठी हा एकमेव मार्ग होता. मात्र या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात चोरटी रेती, डबर,विटांची वाहतूक होत असल्यामुळे या रस्त्याची दुरावस्था झाली, त्यामुळे एसटी, रिक्षासेवा बंद पडल्याने एक वर्षा पूर्वी जनतेच्या उद्रेकानंतर प्रशासनाने हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत दर्जोन्नती म्हणून मंजूर केला.आता या रस्त्याचे काम सुरु झाले आहे. या रस्त्यामुळे आपली सोय होईल.या विश्वासाला रस्त्यांच्या निकृष्ट बांधणीमुळे तडा गेला आहे. एकीकडे हे काम आम्ही व्यविस्थत व दर्जेदार करू असे ठेकेदार आर. के. सावंत यांनी नेमणूक केलेली माणसे आणि कार्यकारी अभियंता आर. एल. दुधे सांगत असतांना दुसरीकडे रस्त्यावरील भलामोठा डांबरचा कोट व खडी आताच उखडली गेली आहे. संबंधित प्रशासकीय यंत्रणा ठेकेदारांशी हातमिळवणी करीत आहेत. त्यामुळे आम्ही वेळोवेळी घटनास्थळी जाऊन दर्जाची तपासणी करतो व ठेकेदाराने निकषांप्रमाणे दर्जा कायम राखला आहे, हा बांधकाम खात्याचा दावा फोल ठरला आहे.अधिकारी घालतात ठेकेदाराला पाठीशी या फुटलेल्या रस्त्याची बांधणी कंत्राटदारामार्फत पुन्हा करवून घेऊ असे उत्तर कार्यकारी अभियंत्यांनी लोकमतला दिले असले तरी काही दिवसातच रस्त्याची अशी अवस्था होत असल्यास पूर्ण रस्त्याची गुणवत्ता कशी असणार? याचा अंदाज आम्हाला आताच आल्याचे राहुल घरत, प्रताप पाटील इ. ग्रामस्थांनी सांगितले. रस्ता फुटलेला आहे हे दिसत असताना ठेकेदाराला वाचवण्याचा हेतुपूर्वक प्रयत्न शासकीय यंत्रणा करीत असल्याचे दिसून येते. या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत आमसभेत पडसाद उमटले होते तर काटाळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने या कामा विरोधात ठराव केला असून लवकरच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी ह्यांच्या कडे तक्र ार केली जाणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष महेंद्र अधिकारी यांनी सांगितले.लोकप्रतिनिधींनी या सर्व ग्रामस्थांना वाऱ्यावर सोडल्याने आपण त्यांच्या साथीने मोठे आंदोलन उभारणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सांबरे यांनी लोकमतला दिली.