शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तलासरी न.पं.च्या नोटिसांना बिल्डर लॉबी जुमानेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 05:02 IST

अनधिकृत बांधकामांविरोधात नगराध्यक्षांची तक्रार : मुख्याधिकाऱ्यांकडून चालढकल होत असल्याचा आरोप

सुरेश काटे

तलासरी : तलासरी नगर पंचायत हद्दीत वाढणाºया अनधिकृत बांधकामांच्या विरोधात खुद्द नगराध्यक्षा िस्मता वळवीनी तक्रार करुनही त्या विरोधात मुख्याधिकारी सागर साळूंखे कारवाई करतो असे मोघम उत्तर देत असल्याने बिल्डर लॉबीला नक्की आशिर्वाद कुणाचे असा सवाल विचारला जात आहे. प्रशासनाकडून फक्त नोटीस पे नोटीस दिल्या जात असून त्यांना बिल्डर लॉबी जुमानत नसुन हा नगरपंचायतीतील झारीती शुक्राचार्यांचा माया कमावन्याचा मार्ग असल्याचा आरोप नागरिकांमधुन होत आहे.

नगर पंचायतीची परवानगी न घेता ही तलासरीतील पाटीलपाडा, सुतारपाडा, मोहितेवाडी, एन एन सन्स, येथे बांधकामे सुरू आहेत या बांधकामांना कोणतीही परवानगी दिली नसल्याचे नगर पंचायतीचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी सांगून त्यांना नोटिसा दिल्याचे सांगितले, पण गेल्या अडिच वर्षात नगर पंचायतीने अनधिकृत बांधकामांना फक्त नोटिसा दिल्या पण कारवाई होत नसल्याने बांधकाम करणारे दलाल ठेकेदार मनमानी पद्धतीने नगर पंचायत तसेच नगर सेवकांना न जुमानता स्लॅबची एक दोन मजल्याच्या इमारती बांधत आहेत.दुर्देवाची बाब म्हणजे नगराध्यक्ष स्मिता वळवी यांनी मुख्याधिकाºयाना पत्र लिहून अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई न करण्यामागचे कारण विचारले आहे. दरम्यान, मुख्याधिकाºयांकडून ही बाब गांभिर्यांने न घेतली जात असल्याने जिल्हाधिकाºयांना पत्र लिहुन कारवाई करण्याबाबत मागणी करणार असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तलासरी नाक्यावरील एन. एन . सन्स येथे तर अनधिकृत बांधकामे करून मार्केट तयार करून तेथील गाळ्यांची लाखो रु पयाला विक्र ी करण्यात आलेली आहे. तलासरी गावात सुरू असलेल्या या बांधकामा कडे नगर पंचायती बरोबर महसूल विभागांचेही दुर्लक्ष आहे. ही बांधकामे करताना तेथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत शासनाचा महसूल बुडवून आणलेल्या रेतीचा वापर होत आहे.

जिल्हाधिकारी यांच्या सहीच्या एन. ऐ. आॅर्डर दाखिवल्या जातात. परंतु, त्याची सत्यता पडताळून पहिली जात नाही. नुकतेच उधवा येथे बोगस एन. ए. आॅर्डर दाखवून मशिदीचे बांधकाम केल्याचे प्रकरण गाजत आहे. या प्रकरणी लाच मागितल्या बाबत गुन्हा दाखल होऊन सहा. पोलीस निरीक्षकला निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे या भागात बोगस कागदपत्र आधारे बांधकामे सुरू असून अशी कागदपत्रे बनविणाºया टोळ्यांचा या भागात बस्तान असल्याने जिल्हा पो. अधिक्षकांनी कारवाई करावी अशी मागणी होते आहे.जिल्हाधिकाºयांना साकडे...च्या अनधिकृत बांधकामांच्या प्रकरणाची जिल्हाधिकारी कार्यालयाकडून साधी दखल ही घेतली जात नसल्याने आता जिल्हाधिकाºयांनी स्वत: लक्ष घालून अनधिकृत बांधकामे व बोगस एन. ए. आॅर्डर बनवून अनधिकृत बांधकामे करणाºया विरोधात कारवाई करावी अशी मागणी नगराध्यक्ष स्मिता वळवी यांनी केली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार