शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
5
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
6
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
7
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
8
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
9
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
10
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
11
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
12
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
13
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
14
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
15
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
16
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
17
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
18
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
19
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
20
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र

डहाणूची महालक्ष्मी यात्रा ३० मार्चपासून, लाखो भाविक येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 03:15 IST

महाराष्ट्र तसेच गुजरात राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तसेच आदिवासींचे कुलस्वामिनी असलेल्या डहाणूच्या महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सावाला ३० मार्चपासून सुरुवात होत आहे.

- शौकत शेखडहाणू: महाराष्ट्र तसेच गुजरात राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तसेच आदिवासींचे कुलस्वामिनी असलेल्या डहाणूच्या महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सावाला ३० मार्चपासून सुरुवात होत आहे. तरी यात्रेच्या निमित्ताने महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, विवळवेढे ग्रामपंचायत, डहाणू पंचायत समिती, डहाणू तहसलदारांकडून जय्यत तयारीसाठी संवंधितांना आदेश देण्यात आले आहेत.ठाणे आणि पालघर जिल्हयातील सर्वात मोठी यात्रा असल्याने तिचे भाविकांना मोठे आकर्षण असते. येथील लोक कुटुंबांसह येथे येतात त्यामुळे यात्रेला शोभा आलेली असते. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चारोटी नाका येथून तीन कि.मी. अंतरावरील महालक्ष्मी मातेचे प्रशस्थ मंदिर आहे. येथे दररोज मुंबई तसेच गुजरातकडे जाणारे असंख्य भाविक मातेचे दर्शन घेऊनच पुढे जातात.देवीची यात्रा चैत्र महिन्यात अर्थात ३० मार्चला सुरु होत असून ती १८ दिवस चालते. बारशीच्या उत्सवाला हजारो आदिवासींची येथे गर्दी होते. तसेच यात्रेदरम्यान नवस फेडण्यासाठी भाविक अनेक दिवस येथे मुक्काम करतात. गुजरात येथील सुरत, नवसारी, बलसाड, वापी, संजान उमरगाव येथील भाविक येथे मुक्कामाला असतात. १६ एप्रिल पर्यंत ही यात्रा चालणार आहे.महालक्ष्मी मातेचा पहीला होम ३१ मार्च (शनिवार) रोजी होणार असल्याने प्रशासन कामाला लागले आहे. रविवार दि. ८ एप्रील रोजी अष्टमीच्या दुसऱ्या हवनाची सुरवात होईल . दरम्यान, १९ मार्च रोजी डहाणूचे सहा. जिल्हाधिकारी आंचल गोयल, तहसीलदार राहुल सारंग, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन पांडकर, कासा पोलिस निरिक्षक जयप्रकाश गुठे, महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट यांची आढावा बैठक होणार आहे.