शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

जिजाऊची वर्षा मॅरेथॉन जिंकली ज्ञानेश्वर मोरघाने; सात हजारांहून अधिक स्पर्धक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 04:15 IST

जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्था तसेच विक्र मगड तालुका कला-क्रीडा संस्थेच्यावतीने ‘एक धाव आरोग्यासाठी’ ह्या मॅरेथॉन स्पर्धेत ७ हजार धावपटूंनी सहभाग घेतला. जिजाऊ संस्थेचा विद्यार्थी ज्ञानेश्वर मोरघा ह्यांनी खुल्या गटांचे विजेतेपद मिळविले.

पालघर/विक्रमगड : जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्था तसेच विक्र मगड तालुका कला-क्रीडा संस्थेच्यावतीने ‘एक धाव आरोग्यासाठी’ ह्या मॅरेथॉन स्पर्धेत ७ हजार धावपटूंनी सहभाग घेतला. जिजाऊ संस्थेचा विद्यार्थी ज्ञानेश्वर मोरघा ह्यांनी खुल्या गटांचे विजेतेपद मिळविले.जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांची कन्या तेजस्विनी सांबरे हिच्या वाढदिवसा निमित्त विक्र मगड तालुक्यातील झडपोली येथे ५ वर्षांपासून कोकण वर्षा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते .यंदा तिचे उदघाटन सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या हस्ते करण्यात आले होते. ह्यावेळी आशियाई कबड्डीपटू दिनेश शिंदे, गिरीश एरणाक, कुस्तीपटू दिपक सदावर्ते, नगराध्यक्ष रवींद्र खुताडे, सभापती मधुकर खुताडे, सहा.पोनि.मानसिंग पाटील,नासा चे शास्त्रज्ञ पराग दुपारे, प्रमोद पाटील, नरेश अक्रे, रवी पाटील, निलेश औसरकर आदी मान्यवर उपस्थित होते.कुपोषणग्रस्त म्हणूंन ओळखल्या जाणाऱ्या ह्या जिल्ह्यात आरोग्य, शिक्षण, सांस्कृतिक, क्रीडा ह्या महत्वपूर्ण बाबीवर सतत्याने होणारे विनामूल्य काम पाहिल्यावर मी खरच अचंबित झाली असून त्यांच्या कामातून ऊर्जा घेऊन मी पुढे जाणार असल्याचे गौरवोद्गार सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णीं ह्यांनी निलेश सांबरे यांच्याबद्दल काढले. झडपोली सारख्या आदिवासी बहुल दुर्गम भागात सीबीएससी सारखी शाळा पाहून मी अचंबित झाली असून इथल्या तरुणांना योग्य दिशा देण्याचे काम सुरू असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.त्यांनी तुमच्यासाठी शाळा-महाविद्यालय,रु ग्णालय, यूपीएससी, एमपीएससी अ‍ॅकॅडमी, ग्रंथालय आदी महत्वपूर्ण गोष्टींची विनामूल्य उभारणी सांबरे यांनी केली असून त्याचा योग्य वापर करून पुढे यशस्वी व्हा,असा सल्ला त्यांनी धावपटूंना दिला.विजयी स्पर्धकांचे त्यांनी मन:पूर्वक अभिनंदन करून त्यांनी आॅलिम्पिकमधील पदक मिळविण्याची महत्वाकांक्षा ठेवावी असे आवाहन केले.स्पर्धेतील विजयी खेळाडू१० वर्ष वयोगट - मुले१) तन्मय संजय गोवारी, मोखाडा२) आदेश रमेश भोये, भोयेपाडा३) नवनाथ बारकू डगला, दादडे१० वर्ष वयोगट - मुली१) दर्शना रसिक वरठा, दादडे२) प्रतिज्ञा कृष्णा रावते, दादडे३) रेणुका दाजी मेठा, डहाणू१४ वर्ष वयोगट - मुले१) मनोज तुळशीराम दिघे, विनवळ२) हनुमान बाबू ताराल, वडपाडा३) शाम देऊ वाघ, विनवळ१४ वर्ष वयोगट - मुली१) कविता शिवराम दंगटे, विनवळ२) रेश्मा सदानंद वड, सायवन३) कुसुम मावजी घाटाल, आंबिस्ते१७ वर्ष वयोगट - मुले१) नागेश मोतीराम भुयाल, कुंजपाडा२) शिवराम जयराम वारघडे, सवरखांड३) नितेश अर्जुन भोरे, मान१७ वर्ष वयोगट - मुली१) श्रद्धा मधुकर पारधी, विक्र मगड२) अर्चना नरेश खुताडे, विक्र मगड३) वृषाली प्रकाश डगले,वज्रेश्वरी१९ वर्ष वयोगट - मुले१) अंकित भास्कर भोरे, देहरे२) विशाल शंकर वळवी, विनवळ3) सचिन रामा गोविंद, झडपोलीखुला - पुरु ष गट१) ज्ञानेश्वर विठ्ठल मोरघा,जिजाऊ स्पोर्ट्स अकॅडमी२) कमळू कल्लू लोते, नाशिक३) कांतीलाल देवराम कुंभारखुला - महिला गट१) रिशु सिंग, नाशिक, २) भारती मनोहर गोंडे , ३) जयश्री नारायण भुजाडे

टॅग्स :Vasai Virarवसई विरार