शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जव्हार प्रतिष्ठान व भाजपाची युती, जव्हारच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 03:12 IST

जव्हार नगर परिषदेची सार्वत्रीक निवडणूक सुरू असून युती-आघाडी, पक्षा पक्षातील मनोमिलन तर कुठे नाराजी अशा वातावरणात जव्हार प्रतिष्ठान व भाजपाने युती केलेली आहे.

जव्हार : जव्हार नगर परिषदेची सार्वत्रीक निवडणूक सुरू असून युती-आघाडी, पक्षा पक्षातील मनोमिलन तर कुठे नाराजी अशा वातावरणात जव्हार प्रतिष्ठान व भाजपाने युती केलेली आहे. जव्हार प्रतिष्ठानचे नगराध्यक्ष व ११ नगरसेवक तर भाजपाचे ६ नगरसेवक अशी १७ उमेदवारांची जुळवणी करून सोमवारी ही युती जाहीर करण्यात आली. यावेळी जव्हार प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत पाटील, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष हरीशचंद्र भोये, सचिन सटाणेकर, कुणाल उदावंत, बबला शेख, ईमरान लुलानिया, मंगल वाघ, नगरसेवक गिरीष मुकणे आदि कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.जव्हारच्या विकासाकरीता प्रयत्नशील असलेल्या जव्हार प्रतीष्ठानला भाजपाची साथ मिळाल्यामुळे त्यांचे पाठबळ अधिक झाले असून जव्हारच्या विकासाच्या दृष्टीने दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते या निवडणूकीत जोर लावणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. जव्हारच्या विकासाला सत्ताधाºयांच्या वादामुळे खिळ बसली होती, मात्र यंदा आमची सत्ता आल्यावर विकास झपाटयाने घडवू असे आश्वासन युतीने दिले.राज्यात भाजपाची सत्ता असल्यामुळे आम्ही घेतलेल्या निर्णयाची व तरतुदीची मागणी वरीष्ठांकडून तातडीने मंजूरकरून आणू, तसेच जव्हारनगर परिषदेनेही याच वर्षी १०० व्या वर्षात पदार्पण केल आहे. असेभाग्य लाभलेली ती एकमेव नगर परिषद आहे, त्यामुळे आम्ही पर्यटन विकास, पाणी समस्या, रस्ते आदि महत्वाच्या समस्या सोडविण्याकरीता १०० व्या वर्षात एकूण १०० कोटीचा निधी मंजूर करून आणू व जव्हारकरांच्या अनेक समस्या कायमच्या दूर करू, असे भरतपाटील यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.> भाजपा समवेत युती केल्याने आमची सत्ता आल्यावर आम्हाला चांगला निधी आणता येईल व आदिवासी विकास मंत्रीही येथीलच असल्यामुळे विकासावर भर देता येईल-हरीश्चंद्र भोये, प्रदेश उपाध्यक्षआम्ही गेल्या काही वर्षापासून जव्हारच्या विकासाच्या दृष्टीने लढत आलो आहे. तसेच काही महिन्यापूर्वी झालेल्या पोट निवडणूकीत आम्हाला १०० टक्के यश प्राप्त झालेले आहे. मतदारांचे कल आमच्याच बाजूने आहे,-भरत पाटील, जव्हार प्रतिष्ठान

टॅग्स :BJPभाजपा