शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जव्हार : आॅस्ट्रेलियाच्या दाम्पत्याकडून मोकाशीपाड्याला नळपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 02:01 IST

आपल्या माता पित्याच्या स्मरणार्थ तालुक्यातील मोकाशी पाडा येथील पाण्याचा प्रश्न सोडविण्यात आल्याचे पुण्य आॅस्ट्रेलिया येथील अनिवासी भारतीय मुरलीधर कुमार व वंदना कुमार यांच्या पदरी पडले आहे.

हुसेन मेमनजव्हार : आपल्या माता पित्याच्या स्मरणार्थ तालुक्यातील मोकाशी पाडा येथील पाण्याचा प्रश्न सोडविण्यात आल्याचे पुण्य आॅस्ट्रेलिया येथील अनिवासी भारतीय मुरलीधर कुमार व वंदना कुमार यांच्या पदरी पडले आहे. ६८ कुटुंब असलेल्या येथील लोकवस्तीला दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झला लागायचा याची माहिती घेऊन स्वनिधीतुन तब्बल साडे आठ लाख खर्च करुन त्यांनी गावकºयांच्या चेहºयावर हसू फुलवले आहे.यामागे दानपुण्याचा भाव असला तरी लोकांच्या समस्येवर त्यांनी काम केल्याने दानशुरांना त्यांनी एक वस्तूपाठ घालून दिला आहे. रविवारी सारसून मोकाशिपाड्यात जलव्यवस्थापण व लोकापर्ण सोहळ्याचे उद्घाटन या आॅस्ट्रेलियातील एनआरआय दांम्पत्यांकडून करण्यात आले.ही नळपाणी पुरवठा पेयजल योजनेसाठी त्यांनी पैसेच खर्च केले असे नसून गावाच्या भौगोलिक स्थितीचा अभ्यास करुन नळपाणी योजना तयार केली हे विशेष. यामध्ये मोकाशीपाड्यात ९ स्टँड पोस्ट बसविण्यात आले आहेत. तर ११ हजार लीटरची टाकी बांधण्यात आली आहे. त्यामुळे आॅस्ट्रेलियाच्या दांम्पत्यांच्या मद्दतीने मोकाशिपाड्याची पिण्याच्या पाण्याची वणवण संपली आहे.जव्हार तालुक्यातील सारसून मोकाशीपाड्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणी टंचाईला सुरवात व्हायची, तसेच एप्रिल, मे महिन्यात तर भीषण पाणी टंचाई निर्माण व्हायची, मात्र आॅस्ट्रेलियाच्या दांम्पत्यांच्या मद्दतीने मोकाशीपाड्यातील महिलांची पाण्यासाठीची वणवण अखेर संपली आहे. आता या आदिवासीपाड्यात घराघरात नळाचे पाणी यायला सुरवात झाली आहे. येथील नागरिकांच्या म्हणी नुसार, सरकारी योजना मिळेल तेव्हा मिळेल मात्र आम्हाला आॅस्ट्रेलियाच्या दांम्पत्यां दानशूर कुटुंबाकडून मुबलक पाणी मिळाले आहे. महिलांमध्ये हा आनंद येवढा मोठा होता की, त्यांनी या कुटुंबाचे स्वागत तारपानाच करून केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी आघाडीचे अध्यक्ष हरीचंद्र भोये, श्रीधर कोचरेकर, जि. प.सदस्य सुरेखा थेतल आदी उपस्थित होते.