शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

राज्यात एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जाण्यासाठी ५ ते ६ तास लागता कामा नये - मुख्यमंत्री

By धीरज परब | Updated: February 15, 2024 19:52 IST

मीरा भाईंदर मधील मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी बुधवारी रात्री मुख्यमंत्री शहरात आले होते.

मीरारोड- राज्याच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जाण्यासाठी ५ ते ६ तासांपेक्षा जास्त लागणार नाही असे रस्त्यांचे जाळे सरकार बनवत आहे. त्यासाठी अनेक रस्ते, पूल बांधून पूर्ण झाले असून अनेक योजना पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शाळा आणि आरोग्य केंद्र आदर्शवत अशी मॉडेल बनवा असे ते म्हणाले. 

मीरा भाईंदर मधील मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी बुधवारी रात्री मुख्यमंत्री शहरात आले होते. भारतरत्न लता मंगेशकर नाटयगृहात बोलताना त्यांनी अनेक विकास योजनां बद्दल सांगितले . ग्रीनफिल्ड पद्धतीने पनवेल वरून गोव्याला ४ तासात पोहचता येईल, अटल सेतू मुळे २ तासांचा प्रवास १५ मिनिटांवर आला आहे. बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्गा मुळे नागपूर ६ तासावर आले आहे. दहिसर वरून येणारा रस्ता हा भाईंदर व पुढे वसई - विरार वरून पालघर ते थेट डहाणूपर्यंत जाणार आहे . विरार-अलिबाग कॉरिडॉर चे काम सुरु आहे.  आपले सरकार आल्या नंतर विकासकामे वेगाने सुरु झाली आहेत असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

सार्वजनिक आरोग्य केंद्र अद्यावत करा.  शाळा मॉडेल अश्या बनवा . सातारा जिल्हाधिकारी यांनी सुमारे ४०० शाळा व आरोग्य केंद्र कशी मॉडेल केली आहेत ते बघा . शाळा चांगल्या करा पण शाळांच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा चांगला व स्वच्छ ठेवा . मीरा भाईंदर मध्ये मेट्रोचे काम सुरु आहे . सूर्याचे पाणी येतेय , सिमेंट रस्ते होत आहेत . जुन्या इमारती व झोपडपट्ट्यांचा विकास साठी क्लस्टर मंजूर केले असून त्याचे प्रत्यक्ष काम सुरु करा . क्लस्टरसाठी अनेक वर्ष आम्ही आंदोलने केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले . 

मीरा भाईंदर हे हे मुंबई - ठाण्याचा भार हलका करणारे मध्यवर्ती शहर आहे . शिवाय वेशीला लागून वसई विरार पण आहे . शहरात धूळ , डेब्रिज , घाण असता काम नये. ऑक्सिजन जास्त प्रमाणात देणाऱ्या बांबूच्या लागवडीसाठी भर दिला जात आहे . बांबू जास्त ऑक्सिजन देतेच पण त्याचा वापर सुद्धा वेगवेगळ्या कामासाठी होतो . झेंडे लावायला , अंतिमयात्रे वेळी बांबू लागतोच तसाच काही जणांना सुद्धा बांबू लावावा सुद्धा लागतो असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला . 

डीप क्लीन ड्राइव्ह मुळे शहर अधिक स्वच्छ होत असून धूळ सुद्धा साफ होते . रस्ते धुण्यासाठी मलनिःसारण प्रकल्पाचे प्रक्रिया पाणी वापरा . पिण्याचे पाणी तर नाही ना वापरत ? असा सवाल पालिका आयुक्तां कडे पहात केला . मुंबईत सफाईकामगारांच्या ४८ वसाहत असून त्या स्वच्छ व चांगल्या ठेवण्याचे आदेश दिल्याचे ते म्हणाले .  

अधिकाऱ्यांनो कार्यालयात बसून नव्हे तर फिल्डवर काम करा अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून नव्हे फिल्डवर काम करावे . कार्यालयात बसून रहाल तर प्रत्यक्ष बाहेरची वस्तुस्थिती समजणार नाही . अधिनस्त अधिकारी जे सांगतील तेवढेच कळेल .  ग्राउंड रियालिटी महत्वाची आहे असे मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना जाहीर कार्यक्रमात सांगितले . फिल्डवर काम करणारे अधिकारी आवडतात . मुख्यमंत्री कधी रस्त्यावर पाणी मारायला गेला होता का ? पण मुख्यमंत्री आल्याने सर्व प्रशासकीय यंत्रणा फिल्डवर दिसते  असे मुख्यमंत्री म्हणाले . 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारmira roadमीरा रोडEknath Shindeएकनाथ शिंदे