शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

पालघरमधील पेसा क्षेत्रातील शिक्षक भरतीचा मुद्दा अधिवेशनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 23:52 IST

सुनील भुसारा यांचे डीएड, बीएड कृती समितीने मानले आभार

मोखाडा : अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सुनील भुसारा यांनी पुरवणी मागणीद्वारे पालघरमधील पेसा भरती सुरू करावी तसेच ज्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे, त्यांना नियुक्ती मिळावी यासाठी शासनाकडे मागणी केली आहे. याबद्दल डीएड, बीएड कृती समितीने आ. सुनील भुसारा यांचे आभार मानले आहेत. 

जिल्ह्याची स्थापना झाल्यापासून भरती न झाल्याने अतिरिक्त ताण जुन्या कर्मचाऱ्यांवर पडला. राज्यपालांनी अधिसूचित केलेली अनुसूचित क्षेत्रातील १७ पदे सरळसेवेने स्थानिक उमेदवारांमधून भरण्याकरिता शासनाने वारंवार आदेश दिले खरे; परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही. याबाबत ९ जून २०१४ रोजी राज्यपालांनी अधिसूचना काढली. ५ मार्च २०१५ व २६ जून २०१५ तसेच २७ ऑगस्ट २०१८ सामान्य प्रशासन विभाग, २३ जुलै २०१८ रोजी पेसा कायद्यांतर्गत अनुसूचित क्षेत्रातील नामनिर्देशाद्वारे केल्या जाणाऱ्या भरतीबाबत मार्गदर्शक सूचना ग्रामविकास विभागाने दिल्या आहेत. २९ ऑगस्ट २०१९ रोजी राज्यपालांनी पुन्हा सुधारित अधिसूचना काढली. 

सामान्य प्रशासन विभागाने २७ ऑगस्ट २०१८ रोजी जनजाती सल्लागार समितीच्या शिफारशीनुसार ज्या अनुसूचित क्षेत्रात बिगर आदिवासींची लोकसंख्या ५० टक्केपेक्षा जास्त आहे, अशा क्षेत्रातील १०० टक्के रिक्त पदे, स्थानिक अनुसूचित जमातीतील उमेदवारांमधून भरण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ९ सदस्यीय समिती गठित झाली. 

महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेच्या ५० व्या बैठकीतील शिफारस क्र. ३४ नुसार अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित केलेली १७ संवर्गातील सरळ सेवेची पदे भरण्यासाठी पुन्हा सामान्य प्रशासन विभागाने तत्कालीन जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एकूण १३ सदस्यांची समिती गठित केली. राज्यपालांनी अधिसूचित केलेली १७ पदे सरळ सेवेने भरण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी त्याबाबत अभ्यास करून शासनास शिफारशी करणे तसेच एसईबीसी प्रवर्गाच्या १३ टक्के व इतर आरक्षणासह शिफारशी करणे यामध्ये १,६३६ शिक्षक रिक्त पदांचा पाठवलेला अहवाल  शासन दरबारी धूळ खात पडला आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. 

पालघर जिल्हाधिकारी यांनी शासनाला जो अहवाल पाठविला आहे, त्यातील शिफारशींची अंमलबजावणी तत्काळ करून पालघरमध्ये पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती झाली पाहिजे. - अलका गावंढा, महिला अध्यक्ष,  आदिवासी डी.टी.एड, बी.एड. कृती समिती, पालघर

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारTeacherशिक्षक