शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने; छत्रपती संभाजीनगरात राडा
2
Arvind Kejriwal Pakistan: अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेवर थेट पाकिस्तानकडून आली प्रतिक्रिया, काय म्हणाले फवाद चौधरी?
3
रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
4
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
5
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
6
खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी
7
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
8
Mumbai Pali Hill Fire: मुंबईच्या पाली हिलमध्ये अग्नितांडव, थरकाप उडवणारा स्फोट; व्हिडिओ व्हायरल!
9
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
10
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
11
स्टार प्रवाहवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! काही मालिकांची वेळही बदलली
12
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचे वाढदिवशी नव्या घरात गृहप्रवेश, व्हिडीओ आला समोर
13
Bank Of Baroda : ₹७.१६ डिविडंड, ₹४८८६ कोटींचा नफा; तुमच्याकडे आहे का 'या' सरकारी बँकेचा शेअर?
14
समोरासमोर या, विकासावर होऊ दे चर्चा; मिहिर कोटेचा यांचं संजय दिना पाटलांना आव्हान
15
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश
16
Adah Sharma : अदा शर्माचं शिक्षण किती?, जगतेय आलिशान आयुष्य; कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या, नेटवर्थ
17
फोक्सवॅगन टायगून! 350 किमी चालविली, 1.0 लीटरचे इंजिन, वजनदार... मायलेजने चकीत केले
18
बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस
19
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?
20
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन

आयर्नमॅन हार्दिक पाटीलचा नवा विक्रम; अल्ट्रामॅन फ्लोरिडा २०२४ स्पर्धा विक्रमी वेळेत पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 2:26 PM

अल्ट्रामॅन या स्पर्धेचा कालावधी हा ३ दिवसांचा असतो.

नालासोपारा (मंगेश कराळे) :- विरारचा आयर्नमॅन अशी ओळख असलेल्या हार्दिक पाटीलने आता आपल्या नावावर नव्या विक्रमाची नोंद केली आहे. यापूर्वी अनेक अर्थ व पुर्ण आयर्नमॅन स्पर्धा देश विदेशात जाऊन हार्दिकने यशस्वीरित्या सफल केल्या आहेत. त्यांच्या विक्रमी नोंदींमध्ये आणखी एक महत्वपूर्ण व विक्रमी स्पर्धेची व ती स्पर्धा ठराविक वेळेत यशस्वीरित्या पूर्ण करण्याची भर पडली आहे.

अल्ट्रामॅन फ्लोरिडा २०२४ हि स्पर्धा सलग तीन दिवसांत अमेरिकेतील फ्लोरिडा याठिकाणी सातासमुद्रापार परदेशात पुर्ण करत हार्दिकने देशाचे तसेच महाराष्ट्राचे नाव उंचावले असून त्याने भारताचा झेंडा अटकेपार फडकवला आहे. फ्लोरीडा येथे ९, १० व ११ फेब्रुवारीला अल्ट्रामॅन फ्लोरिडा स्पर्धेत सहभागी होऊन विक्रमी वेळेत त्याने हि स्पर्धा पार केली आहे.

अल्ट्रामॅन या स्पर्धेचा कालावधी हा ३ दिवसांचा असतो. प्रत्येकी दिवसाला १२ तास याप्रमाणे १० किमी जलतरण, ४२० किमी सायकलिंग, ८५ किमी धावणे अशी ही स्पर्धा पूर्ण करावयाची असते. मात्र अवघ्या ३१ तास ४६ मिनिटांत हार्दिकने ही स्पर्धा विक्रमी वेळेत पार करत आपल्या नावावर अल्ट्रामॅनचा छापा उमटवला आहे. संपूर्ण जगामधून १७ देशातील ४८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ६ स्पर्धक है भारतीय होते. ६ पैकी फक्त ४ स्पर्धकांनी ही स्पर्धा पूर्ण केली असून या ४ भारतीय स्पर्धकांपैकी ३ स्पर्थक महाराष्ट्रामधील तर १ दिल्ली येथील रहिवासी होते. 

पहिला दिवस :- १० किमी स्वीमिंग (४ तास ५ मिनिटे)                      १४५ किमी सायकलिंग (५ तास २० मिनिटे)

दुसरा दिवस :- २७५ किमी सायकलिंग (१० तास ४५ मिनिटे)

तिसरा दिवस :- ८५ किमी धावणे (११ तास १० मिनिटे) हार्दिक हा भारतीय स्पर्धक सर्वात जलद ही स्पर्धा पूर्ण करणारा भारतीय ठरला आहे. आजतोवरच्या इतिहासात फक्त १८ भारतीय स्पर्धकांनीच हि स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. खेळाडूच्या जिद्दीची कसं पहाणारी हि स्पर्धा आजपर्यंत ७० ते ८० टक्के लोकंच यशस्वीरित्या पूर्ण करत असतात. हार्दिकच्या या कामगिरीचा पालघर, विरार  वसईकरांसह संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटला आहे. त्याच्या या यशामुळे पालघर, ठाणे, जिल्ह्यासह देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हार्दीकने यापुर्वी जगभरात आयर्नमॅन तसेच जागतिक मॅरेथॉन स्पर्धा यांमध्ये सहभाग घेऊन अनेक विक्रमांची नोंद केली आहे. त्यामध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तब्बल आठ वेळा, वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये चार वेळा आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सहा वेळा नोंद केली आहे. येणाऱ्या काळामध्ये पालघर, ठाणे जिल्ह्यातील खेळाडूसाठी चांगल व्यासपीठ म्हणून स्पोर्ट क्लब देखील उघडणार असल्याचा त्याचा मानस आहे.

टॅग्स :nalasopara-acनालासोपाराVasai Virarवसई विरार