शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

प्रतिष्ठानमुळे पोटनिवडणूका अटळ

By admin | Updated: May 3, 2017 05:12 IST

अपात्र ठरलेल्या पाच नगरसेवकांच्या प्रभागात घोषित झालेली पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय जव्हार प्रतिष्ठानने घेतल्याने

हुसेन मेमन / जव्हारअपात्र ठरलेल्या पाच नगरसेवकांच्या प्रभागात घोषित झालेली पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय जव्हार प्रतिष्ठानने घेतल्याने इतर पक्षांनी तिच्यावर बहिष्कार टाकला तरी ती होण्याची चिन्हे दिसत आहेत. जव्हारमध्ये सर्वपक्षीय एकत्र येऊन या निवडणूकीवर बहिष्कार टाकून एकही उमेदवार न उभा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. व याला गावकऱ्यांनीही पाठींबा देण्याचे आवाहनही करण्यात आलेले आहे. परंतु जव्हार प्रतिष्ठान संस्थेकडून मात्र निवडणूकीची जय्यत तयारी सुरू असल्याची चिन्हे दिसत आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक विविध पक्षांनी जरी नाही लढविली तरी अपक्ष आणि प्रतिष्ठानचे उमेदवार ती लढवतील असाच रंग आहे. जव्हार प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष भरत पांडुरंग पाटील हे गेल्या काही दिवसांपासुन जव्हार येथेच ठाण मांडून बसलेले असल्याने, त्यांचे कार्यकर्तेही या निवडणूकीकरीता एकवटलेले दिसतात. तसेच गेल्या काही वर्षापासुन जव्हार तालुक्यात प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध रोजगार उपयोगी मोफत उपक्रम राबविले जात असल्याने त्याचा प्रभाव आहे. येत्या सहा महिन्यातच पुन्हा पंचवार्षिक निवडणूका होणार असल्यामुळे अल्प कालावधीसाठी नगर परिषदेचे पर्यायाने जनतेचे पैसे या निवडणूक प्रक्रियेसाठी खर्च होणार आहेत. नगर परिषदचे हे शताब्दी वर्ष असून हा निधी त्यासाठी वापरता येऊ शकेल अथवा विकास कामांसाठीही त्याचा उपयोग होईल. जव्हारच्या हिताच्या दृष्टीने सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन ही निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे तरीही जव्हार प्रतिष्ठानकडून त्या लढविण्याची सज्जता होत असल्याने जव्हारकर संभ्रमात सापडले आहेत. राजकारणाच्या साठमारीत एकीकडे आड तर दुसरीकडे विहिर अशी गत सध्या जव्हारकरांची झालेली आहे. वास्तवात काय घडेल?शहराच्या दृष्टीने या पोटनिवडणुका टळाव्यात यासाठी सर्वपक्षिय नेते जव्हार प्रतिष्ठानच्या नेत्यांची मनधरणी करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जर ती सफल झाली तर पोटनिवडणुकांवरील बहिष्कार कायम राहिल व त्या होणार नाहीत अशीही चर्चा सुरु आहे. परंतु प्रत्यक्षात काय घडेल? ते लवकरच कळेल.